Gadar 2 star cast Twitter/@taran_adarsh
मनोरंजन

Gadar 2: सनी-अमिषा पुन्हा 'तारा अन् सखीनाच्या लूकमध्ये, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

लवकरच Gadar 2 प्रदर्शित होणार आहे. 'गदर-एक प्रेम कथा'च्या आठवणी रसिकांच्या मनात ताज्या होणार

दैनिक गोमन्तक

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा गदर चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. कोणीही विसरू शकणार नाही असा हा चित्रपट होता. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावले. गदर (Gadar-Ek Prem Katha) चे अविस्मरणीय संवाद आजही लोकांच्या जिभेवर आहेत. दरम्यान, गदर चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. ही बातमी ऐकून पुन्हा एकदा 2001 च्या 'गदर-एक प्रेम कथा'च्या आठवणी रसिकांच्या मनात ताज्या होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'गदर' चित्रपटाचा सिक्वेल बनवला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आयकॉनिक पीरियड ड्रामा चित्रपट 'गदर 2'(Gadar 2) ची शूटिंग लखनऊमध्ये पूर्ण झाली आहे.

या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. गदर 2 चित्रपटाच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या भाग 2 चे जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. यासोबतच चित्रपटाच्या शूटिंगचे पुढील शेड्यूल या वर्षीच्या जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत गदर 2 यावेळी देखील त्याच उत्साहात आणि एका नवीन अनुभवासह पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग लखनऊशी जोडलेल्या बाराबंकी येथील जिल्हा कारागृहात झाले आहे. या सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगसाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सरकारकडून परवानगी घेतली होती. यापूर्वी हे शूटिंग 16 एप्रिलपासून सुरू होणार होते, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलून 20 एप्रिलपासून सुरू करण्यात आले. त्यानंतर आता चित्रपटाचे शूटिंग संपले आहे.

अभिनेता सनी देओलचे ट्विट

या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांची मने जिंकताना दिसणार आहेत. सनी देओलने त्याच जुन्या तारा सिंगच्या लूकमध्ये त्याचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. “फक्त भाग्यवान लोकांनाच आश्चर्यकारक पात्रांना पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळते. 20 वर्षांनंतर तारा सिंह पुन्हा इथे!'गदर 2' चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केल्यानंतर मला खूप चांगले वाटत आहे,असे कॅप्शन देत ट्विट केले आहे.

अमिषाने जुन्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत

चित्रपटाच्या अधिकृत घोषणेनंतर अभिनेत्री अमिषा पटेलनेही चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली. फोटोंमध्ये सनी देओल तारा सिंहच्या लूकमध्ये दिसत होता, तर दुसरीकडे अमिषानेही तिचा जुना लूक कॅरी केला होता. शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोन्ही कलाकार त्यांच्या टीमसोबत दिसत होते.

तीच जुनी शैली पुन्हा पाहायला मिळणार आहे

गदर-2 या चित्रपटाचा सिक्वेल या वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे. प्रेक्षक आणि चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT