IND Vs NZ: "अभिषेक, वरुण फायनल खेळणार का"? कॅप्टन सूर्याने दिली प्रतिक्रिया; सेंटनरला म्हणाला 'आता काहीतरी नवे बोला!'

Suryakumar Yadav: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सूर्यकुमार मोकळेपणाने आणि खुलून बोलला.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबाद: लाखभर प्रेक्षकांना शांत झालेले पहायचेय, असे तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस म्हणाला होता. आता तीच री न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरनेही ओढलीय... यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमारने हसत हसत प्रत्युत्तर दिले... आता काहीतरी नवे बोला!

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सूर्यकुमार मोकळेपणाने आणि खुलून बोलला. फॉर्म नसलेल्या अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीची पाठराखणही केली.

Suryakumar Yadav
Ind Vs NZ: अहमदाबादमधील स्टेडियमवर भारतीय संघाचे काय होणार? अक्षर पटेल म्हणाला, 'मै हूं ना..'

कोणतीही खेळपट्टी असू दे!

उद्याच्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचा मुद्दा गाजतोय, लाल की काळ्या मातीची किंवा मिश्र मातीची खेळपट्टी तयार केली आहे, या प्रश्नावर सूर्यकुमार म्हणतो, आम्ही लाल किंवा काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत, त्यामुळे समोर असेल त्यावर खेळण्यास सज्ज आहोत.

Suryakumar Yadav
Ind vs NZ: किवींचे 'चक्रव्यूह' टीम इंडियाला भेदता येईल का? टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचा वरचष्मा? फायनलपूर्वी धक्कादायक आकडे समोर

येथे कोणी मोठा भाऊ नाही

भारतीय संघातील वातावरणाबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, संघातील प्रत्येक खेळाडूचे व्यक्तिमत्त्व वेगवेगळे आहे. येथे मोठा भाऊ किंवा वडील बनून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना मोकळे सोडले तर कामगिरी अधिक खुलून होते म्हणून मीही जबरदस्ती करत नाही; मात्र परिस्थिती हाताबाहेरही जाऊ देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com