Shigmotsav: 'ओस्सय...ओस्सय'! राजधानी दुमदुमली; पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष

Panaji Shigmotsav: लहान मुलांनी साकारलेल्या आकर्षक वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नेत्रदीपक चित्ररथ आणि लोककलांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने भारून गेला.
Panaji Shigmotsav
Panaji ShigmotsavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत शनिवारी सायंकाळी शिमगोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘ओस्सय...ओस्सय’च्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत लहान मुलांनी साकारलेल्या आकर्षक वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नेत्रदीपक चित्ररथ आणि लोककलांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने भारून गेला.

सायंकाळी चारच्या सुमारास जुन्या सचिवालयासमोर पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या हस्ते ध्वज दाखवून शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी समितीचे मंगलदास नाईक, शांताराम नाईक तसेच पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला व पुरुष मंडळांनी आपापली कला सादर केली. यावेळी मोठ्यांबरोबरच लहान मुलांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा आणि पारंपरिक वेशभूषा प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरल्या. अनेक नागरिक या वेशभूषांची छायाचित्रे काढताना दिसले, तर काहींनी मुलांसोबत सेल्फी घेण्याचाही आनंद लुटला.

Panaji Shigmotsav
Shigmotsav: 'ढोल-ताशांवरती काठी पडल्यावर संचारल्यागत झाला नाही तर तो गोमंतकीय कसला'? गोव्यातल्या शिगम्यातली वाद्ये आणि वादन

दरम्यान, रस्‍त्‍याच्या कडेला अनेक ठिकाणी दुचाक्या अस्ताव्यस्त उभ्या केल्याचे दिसून आले. या वाहनांची वाहतूक पोलिसांनी छायाचित्रे घेतली असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्‍यांनी दिली.

Panaji Shigmotsav
Goa Shigmotsav: यंदापासून वाळपईचा शिमगोत्सव सात दिवसांचा! वाळपई मासोर्डेची आज घोडेमोडणी; रात्रीपासून करवल्या उत्सवास प्रारंभ

चित्ररथ पाहण्‍यासाठी झाली तोबा गर्दी

शोभायात्रेच्या सुरुवातीला हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सवाद्य पथक होते. त्यांच्या ढोल-ताशांच्या तालावर सादर केलेल्या विविध कलाप्रदर्शनांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. रात्री उशिरापर्यंत शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. लोककला सादरीकरणानंतर विविध मंडळांचे चित्ररथ सादर करण्यात आले.

धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित हलते चित्ररथ पाहून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले आणि शोभायात्रेची रंगत अधिकच वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com