VIDEO: 6 वर्षांनंतर ‘गोवा बोईंग’चे यशस्वी उड्डाण! अहमदाबादपर्यंत घेतली भरारी; लवकरच होणार सेवेत दाखल

Air India Boeing 777 Goa: सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये विमान उड्डाण करताना लोक ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत असल्याचे दिसते.
Air India Boeing 777 Goa, Boeing 777 Goa test flight
Air India Boeing 777 Goa, Boeing 777 Goa test flightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एअर इंडियाच्या एका बोईंग ७७७ विमानाला ‘गोवा’ असे नाव देण्यात आले असून जवळपास पाच-सहा वर्षे जमिनीवर पडून राहिल्यानंतर या विमानाने शुक्रवारी अखेर यशस्वी चाचणी उड्डाण केले. नागपूरजवळील मिहान एसईझेडमधील एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या एमआरओ डेपोमधून दुपारी सुमारे दोनच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले.

अनेक वर्षे जमिनीवर खिळून राहिलेल्या या विमानाचे उड्डाण पाहताना उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये विमान उड्डाण करताना लोक ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत असल्याचे दिसते.

चाचणी उड्डाणादरम्यान वैमानिकांनी विमान अहमदाबादपर्यंत नेले. या दरम्यान तांत्रिक पथकाने विमानातील सर्व प्रणाली योग्यरीत्या कार्यरत आहेत का? याची तपासणी केली.

प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्याचे सांगितले जात असून पुढील चाचण्यांचे निकाल सकारात्मक आल्यास हे विमान पुन्हा लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवेत दाखल होऊ शकते.

फेब्रुवारी २०२० मध्ये नियमित ‘सी-चेक’ या व्यापक देखभाल प्रक्रियेसाठी हे विमान मिहान येथील एमआरओ केंद्रात आणण्यात आले होते. साधारणतः २८ ते ३० दिवसांत पूर्ण होणारी ही प्रक्रिया विविध कारणांमुळे विलंबली आणि विमान जवळपास सहा वर्षे सेवेबाहेरच राहिले.

या काळात काही सुटे भाग इतर बोईंग ७७७ विमानांच्या दुरुस्तीसाठी वापरले गेले, तसेच विमान उद्योगात सुट्या भागांची कमतरता निर्माण झाल्याने दुरुस्तीची प्रक्रिया लांबली. या कालावधीत टाटा समूहने एअर इंडियाचा ताबा घेतला. आवश्यक सुटे भाग उपलब्ध होण्यास विलंब झाल्यामुळे ‘गोवा’ विमानाची दुरुस्तीही उशिरा पूर्ण झाली, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

जवळपास सहा वर्षांनंतर हे विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार झाल्याने तांत्रिक पथकासाठीही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इतका काळ जमिनीवर असलेले विमान पुन्हा उड्डाणक्षम बनवणे हे मोठे यश मानले जात असून ‘गोवा’ नावाचे हे बोईंग ७७७ विमान लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Air India Boeing 777 Goa, Boeing 777 Goa test flight
Fly 91 Flights: ‘फ्लाय 91’ च्या ताफ्यात नवीन 2 विमाने! उड्डाणांच्या संख्येत होणार वाढ; नेटवर्कमध्ये 'या' नवीन शहरांचा समावेश

सेवेसाठी मंजुरीची शक्यता!

सध्या मात्र या विमानाला केवळ चाचणी उड्डाणाचीच परवानगी देण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यापूर्वी आणखी तांत्रिक तपासण्या आणि मंजुरी आवश्यक आहेत. नागरी उड्डाण महासंचालनालयाने अद्याप व्यावसायिक सेवेसाठी अंतिम परवानगी दिलेली नाही. चाचणी उड्डाणानंतर विमान पुन्हा मिहान एसईझेडमधील एमआरओ हँगरमध्ये आणण्यात आले आहे. पुढील आठवड्यात महासंचालनालयाचे पथक अंतिम तपासणीसाठी येथे येणार असून त्यानंतर व्यावसायिक सेवेसाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे विमान देशांतर्गत मार्गांवर चालवण्याचा विचार होता, मात्र पुढे ते आंतरराष्ट्रीय मार्गांवरही तैनात करण्याची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com