Sonu Sood Family  Dainik Gomantak
मनोरंजन

Sonu Sood साठी कुटुंब महत्त्वाचे, आई-वडीलांकडून मिळाले समाजसेवचे संस्कार

एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्या करिअरला वेगळं वळण मिळालं.

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात केलेल्या विविध कामांमुळे प्रसिद्धीच्या विशेष झोतात आलेला अभिनेता सोनू सूदसाठी कुटुंब ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. सोनू पंजाबी कुटुंबातला पंजाबमधल्या मोगा इथं त्याचा जन्म झाला. त्याचे वडील शक्तीसागर व्यावसायिक आहेत, तर आई सरोज इंग्रजीची प्राध्यापक सोनूला दोन बहिणी आहेत.

एक बहीण मोनिका सूद वैज्ञानिक आहे, तर दुसऱ्या बहिणीचं नाव मालविका सच्चर. या दोन्ही बहिणींचा सोनू अतिशय लाडका आहे. पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर सोनू नागपूरला गेला. तिथं त्यानं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयात असताना शेवटच्या वर्षातच त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्या करिअरला वेगळं वळण मिळालं.

सोनू सूदनं कोरोना काळात जी मदत केली, त्याची बीजं त्याच्या कुटुंबातील मूल्यांमध्ये आहेत. आपलं कुटुंब मध्यमवर्गीय होतं; पण इतरांना मदत केली पाहिजे, असं आई-वडील सतत सांगत राहायचे, असं सोनू सांगतो. त्याचे आई-वडील दोघंही अनेकांना मदत करत असायचे. ते सोनू बघत होता. त्यातून त्याच्यातही तसे संस्कार झाले.

सोनूच्या पत्नीचं नाव सोनाली त्यांना अयान आणि ईशान अशी दोन मुलं आहेत. सोनूच्या वडिलांनी त्याच्यावर कधीही आवाज चढवला नाही. ते त्याच्याशी मित्रासारखे होते, त्यामुळे सोनूही अयान आणि ईशानशी तसंच वागायचा प्रयत्न करतो. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांना फिरायला नेणं त्याला खूप आवडायचं. नंतर काम वाढल्यावर आता त्याला घरी वेळ कमी मिळतो; मात्र जो काही वेळ मिळेल तो चांगल्या पद्धतीनं घालवायचा तो प्रयत्न करतो. त्याची दोन्ही मुलं टेक्नोसॅव्ही (Techno Savvy) आहेत.

त्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असं सोनू सांगतो. त्यांच्याइतकी क्रिएटिव्हिटी (Creativity) आपल्याकडंही नाही, असं तो गंमतीनं सांगतो. मुलांबरोबर क्रिकेट खेळणं त्याला खूप आवडतं. कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून शक्य तेव्हा बाहेर फिरायला जाणं सोनूला आवडतं. अयान आणि ईशान दोघंही अतिशय नॉर्मल मुलं आहेत आणि वडील मोठे अभिनेते आहेत असं ती त्यांच्या मित्रमंडळींना शक्यतो सांगत नाहीत ही गोष्ट सोनूला आवडते. मुलांनी भविष्यात काहीही केलं तरी चालेल; पण जे काही करतील ते त्यांनी मनापासून करावं असं त्याला वाटतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT