Emergency: 'संजय गांधीं'चा फर्स्ट लूक रिलीज, साऊथचा अभिनेता साकारणार दमदार भूमिका

निर्मात्यांनी 'इमर्जन्सी'मधील संजय गांधींचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
Sanjay Gandhi Emergency Look
Sanjay Gandhi Emergency LookTwitter

Sanjay Gandhi Emergency Look: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सतत चर्चेत असतो. दरम्यान, निर्मात्यांनी 'इमर्जन्सी'मधील संजय गांधींचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात दिवंगत नेते संजय गांधी यांची भूमिका दक्षिणेतील अभिनेता विशाक नायर साकारत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता कंगनाने 'इमर्जन्सी' चित्रपटातील आणखी एका पात्राचा लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विशाक नायर संजय गांधींच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरमध्ये अभिनेता विशाकचा लूक संजय गांधींसारखा दिसत आहे.

Sanjay Gandhi Emergency Look
Mahima Chaudhry Birthday: 'या' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; महिमा चौधरीचा हा किस्सा माहित आहे का?

संजय गांधींचा फर्स्ट लूक शेअर करताना कंगना राणौतने इंस्टाग्रामवर या पोस्टला कॅप्शनही लिहिलं आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'प्रतिभेच्या पॉवरहाऊसची ओळख करून देत आहोत, संजय गांधी, संजय इंदिराजींचा आत्मा होता आणि इंदिराजींनी त्यांना सर्वात जास्त प्रेम दिले आणि सर्वात मोठे नुकसान त्यांचे झाले.'

Sanjay Gandhi Emergency Look
Brahmastra 4th Day Collection : तब्बल चौथ्या दिवशीही ब्रह्मास्त्रचा Box Office वर जल्लोष

विशाक नायर हा साऊथ सिनेमातील तरुण कलाकारांपैकी एक आहे. त्याचबरोबर अनुपम खेर, कंगना राणौत, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण आणि महिमा चौधरी यांचा लूकही 'इमर्जन्सी' चित्रपटातून समोर आला आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटाची कथा इंदिरा गांधींनी 1975 साली लादलेल्या 'आणीबाणी'वर आधारित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com