Emerging directors have strong faith in their storytelling Dainik Gomantak
मनोरंजन

उदयोन्मुख दिग्दर्शकांना आपल्या कथानकाबद्दल हवा ठाम विश्वास

दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उदयोन्मुख आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांकडे दर्जेदार कथानक असणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उदयोन्मुख आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांकडे दर्जेदार कथानक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा आपल्या कथेवर दृढ विश्वास असायला हवा, असा सल्ला राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी दिला. IFFI त ‘चित्रपट निर्मिती’ या विषयावर झालेल्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते.

माझ्या चित्रपटाच्या संकल्पनेचा जन्म कायम माझ्यापासूनच होतो. माझा माझ्यावर आणि माझ्या कथांवर पूर्ण विश्वास असतो. जेव्हा कधी माझ्या कथानकाबद्दल माझ्या मनात पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच मी चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात करतो, असे भांडारकर म्हणाले.

यापुढे विनोदी चित्रपट बनवण्‍यावर भर

चित्रपट रासिकांशी संवाद साधताना भांडारकर म्हणाले की, आजच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना उत्तम संधी मिळाली आहे. चाँदनी बार चित्रपटामुळे माझा या क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला. या चित्रपटाच्या सुरुवातीपासून मी गुंतलो होतो. जरी हा चित्रपट अत्यंत गडद आणि निराशाजनक विषयावरचा होता तरीही तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल असा तयार करण्याचा मी प्रयत्न केला. आता मी विनोदी चित्रपट निर्मितीसाठी काम करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

Panaji Smart City: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! खोदकाम सुरू; पण फलक नाहीत; दुचाकीस्वारांना धोका

Tribal Reservation Bill: आदिवासी विधेयकावर लोकसभेत होणार चर्चा; राजकीय प्रतिनिधित्वाला मिळणार बळकटी; तानावडेंनी दिली माहिती

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

SCROLL FOR NEXT