75 क्रिएटिव्ह माईंडस’वर महाराष्ट्र व केरळचे वर्चस्व

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त यावर्षीच्या इफ्फीत ‘75 क्रिएटिव्ह माईंडस्‌ ऑफ टुमारो'' या विशेष विभागाची घोषणा करण्यात आली होती.
Dominance of Maharashtra and Kerala on 75 Creative Minds
Dominance of Maharashtra and Kerala on 75 Creative MindsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त यावर्षीच्या इफ्फीत (IFFI) ‘75 क्रिएटिव्ह माईंडस्‌ ऑफ टुमारो'' या विशेष विभागाची घोषणा करण्यात आली होती. त्‍यात निवड झालेल्या 75 जणांची यादी आज जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातून सर्वाधिक 14 तर त्यापाठोपाठ केरळमधून 8 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्युरीने निवडलेल्या ७५ सर्जनशील कलाकारांमध्ये चित्रपटकार, अभिनेते, गायक, पटकथा लेखक, कला दिग्दर्शक आदी क्षेत्रांमध्ये काही करू इच्छिणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. भारतातील २३ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधून ते इफ्फीत आले आहेत. त्यामध्ये आसाम आणि मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमधील पाच जणांचा आणि जम्मू आणि काश्मीरमधील एकाचा समावेश आहे.

Dominance of Maharashtra and Kerala on 75 Creative Minds
IFFI 2021: 75 क्रिएटिव्ह माईन्ड्समध्ये गोव्याचे दोन तरुण

हे सर्व 75 तरुण विविध राज्यांमधून निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश (2), आसाम (4), बिहार (4), छत्तीसगड (3), दिल्ली (6), गोवा (2), जम्मू आणि काश्मीर (1), गुजरात (1), हरयाणा (1), हिमाचल प्रदेश (2), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (8), मध्य प्रदेश (4), महाराष्ट्र (14), मणिपूर (1), पंजाब (1), राजस्थान (1), तामिळनाडू (4), तेलंगण (2), उत्तर प्रदेश (3), उत्तराखंड (3) आणि पश्चिम बंगाल (6) यांचा समावेश आहे. या 75 सर्जनशील गुणवंतांना अनेक नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांना भेटण्याची संधी इफ्फीमध्ये उपलब्ध होणार आहे.

देशाच्‍या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना आम्ही पहिल्यांदाच 75 उदयोन्मुख गुणवंतांची निवड केली असून त्यांना मार्गदर्शन उपलब्‍ध करून देणार आहोत. त्यांची निवड पारदर्शीपणे अतिशय बारकाईने केलेल्या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये निवडण्यात आलेला सर्वांत तरुण उमेदवार बिहारमधील 16 वर्षांचा आर्यन खान हा आहे. चित्रपट दिग्दर्शनातील कौशल्यासाठी त्‍याची निवड झाली आहे.

- अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com