Aishwarya Thackeray Bollywood entry Dainik Gomantak
मनोरंजन

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Aishwarya Thackeray debut: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी 'निशांची' या क्राईम ड्रामा चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल टाकत आहे

Akshata Chhatre

Aishwarya Thackeray Bollywood debut: राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असलेल्या ठाकरे घराण्याचा सदस्य आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी 'निशांची' या क्राईम ड्रामा चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल टाकत आहे. गुरुवारी (दि. ३१) या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला असून, हा सिनेमा १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'निशांची' चा फर्स्ट लूक आणि दमदार स्टारकास्ट

'निशांची'चा फर्स्ट लूक शेअर करताना निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “पोस्टर छपवा दिये है, अब लगने वाले है. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता ८० च्या दशकातील ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांची आठवण होते. या पोस्टरवरून ऐश्वर्य यात दुहेरी भूमिकेत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या सिनेमात तो वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्युब आणि कुमुद मिश्रा यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

अनुराग कश्यप काय म्हणाला?

चित्रपटाबद्दल बोलताना अनुराग कश्यप यांनी एका निवेदनात सांगितले की, "आम्ही २०१६ मध्ये 'निशांची'ची पटकथा लिहिली होती. तेव्हापासून मी हा चित्रपट जसा असावा तसा बनवण्यासाठी योग्य स्टुडिओच्या शोधात होतो. Amazon MGM ने यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. माझ्या ज्या चित्रपटांवर लोकांनी प्रेम केले, त्यांना अशाच महान निर्मात्यांनी आणि स्टुडिओनी पाठिंबा दिला होता. 'निशांची' ही माणसांच्या भावना, प्रेम, वासना, सत्ता, गुन्हा आणि शिक्षा, विश्वासघात, प्रायश्चित्त आणि त्याचे परिणाम यावर आधारित कथा आहे."

गँग्स ऑफ वासेपूर'ची आठवण, चाहत्यांमध्ये उत्सुकता

या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी या चित्रपटाची तुलना अनुराग कश्यपच्या गाजलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर', 'गुलाल' आणि 'मुक्काबाज' यांसारख्या सिनेमांशी केली आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे, "गँग्स ऑफ वासेपूरची आठवण झाली." तर, दुसऱ्या एका युझरने "हा चित्रपट हिट होणार" असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shivsena: विधानसभेची तयारी? एकनाथ शिंदेची शिवसेना गोव्यात करणार महत्वाची घोषणा

Goa News Live Update: आप अध्यक्ष अमित पालेकर यांनी रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी केले सायकल राईडचे आयोजन

NH 66 Road Closure Goa: पणजीला जायचं कसं? ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा रस्ता 'पाच महिने बंद'

Bandora: उंच पठारांवर पडणारा पाऊस, झऱ्यांचे रूपाने सखल भागांकडे धाव घेतो; बांदोडा गावची जैवविविधता

Pearl Fernandes: भूतानमध्ये गोमंतकीय 'पर्ल'चा डंका! सॅफ करंडकमध्ये भारताने नमवले बांगलादेशला

SCROLL FOR NEXT