Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

Ramayana Bollywood Cast: या भव्यदिव्य चित्रपटाची स्टार कास्ट आता फायनल झाली असून, दिवाळी २०२६ मध्ये पहिला भाग, तर दिवाळी २०२७ मध्ये दुसरा भाग प्रदर्शित होईल
Ramayana Bollywood Star Cast
Ramayana Bollywood Star CastDainik Gomanta
Published on
Updated on

Ramayana Movie Actors: बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या भव्यदिव्य चित्रपटाची स्टार कास्ट आता फायनल झाली असून, दिवाळी २०२६ मध्ये पहिला भाग, तर दिवाळी २०२७ मध्ये दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांना एका अनोख्या आणि अविस्मरणीय अनुभवाची भेट देण्यासाठी दिग्दर्शक नितेश तिवारी सज्ज झाले आहेत.

प्रमुख भूमिका आणि कलाकारांची फौज

या बहुप्रतीक्षित 'रामायण'मध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. शांत आणि कनवाळू राजकुमार असलेल्या रामाचे हे दमदार रूप पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत. रणबीरच्या या भूमिकेसाठी मोठ्या पडद्यावर त्याचा नवीन लूक कसा असेल, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Ramayana Bollywood Star Cast
Konkani Ramayana: कुडतरीत वसिष्ठांनी 'बालरामासाठी' केलं होतं राक्षसाशी युद्ध; अशी आहे गोव्याच्या मातीत रुजलेली रामायणातील आख्यायिका

श्रीरामाचा उजवा हात आणि निष्ठावान भाऊ लक्ष्मणाची भूमिका हिंदी टीव्ही अभिनेता रवी दुबे साकारणार आहे. तो या पात्राला आपली भावनिकता आणि निष्ठा देऊन जिवंत करेल अशी अपेक्षा आहे. रामायण सीतेशिवाय अपूर्ण असून या महत्त्वाच्या पात्रासाठी दिग्दर्शक नितेश तिवारींनी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड केली आहे. तिच्या अभिनयातून सीतेची शक्ती, प्रेम आणि संयम प्रेक्षकांना अनुभवता येईल.

रावण आणि हनुमानाची दमदार उपस्थिती

'KGF' फेम यश लंकेच्या शक्तिशाली राजा महाबली रावणाच्या भूमिकेत दिसेल. यशची दमदार स्क्रीन प्रेझेन्स पाहता, त्याचे रावणाचे पात्र या चित्रपटाचे एक मोठे आकर्षण ठरेल यात शंका नाही. तर, बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते सनी देओल सर्वांची आवडती हनुमानाची भूमिका साकारतील. त्यांच्या दृश्यांमध्ये अॅक्शन, ताकद आणि ऊर्जा यांचा अनोखा संगम असेल.

सहाय्यक भूमिका

इंद्रा कृष्णा रामाची आई कौसल्याची भूमिका साकारणार असून, त्यांच्या अभिनयातून आईचे वात्सल्य आणि ममता प्रेक्षकांना भावेल. दूरदर्शनवरील 'रामायण'मध्ये 'राम' बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अरुण गोविल आता या चित्रपटात रामाचे वडील, राजा दशरथांच्या भूमिकेत दिसतील. अरुण गोविल यांना पुन्हा एकदा रामायणात पण एका वेगळ्या भूमिकेत पाहणे जुन्या चाहत्यांसाठी एक भावनिक आणि खास क्षण ठरणार आहे. रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका अभिनेत्री काजल साकारणार असून, तिचे पात्र लंकेच्या कथानकात भावनिक पैलू देईल.

नितेश तिवारींचा हा रामायण चित्रपट प्रेक्षकांना एका भव्य, सुंदर आणि अविस्मरणीय अनुभवाची भेट देईल अशी अपेक्षा आहे. या मोठ्या पडद्यावरील रामायणासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com