Bollywood Ramayan: ''रामायणाला हातच लावायला नको होता!' रणबीर-साई पल्लवीच्या सिनेमावर सीतेची नाराजी

Ramayan Movie Controversy: अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सध्या चर्चेत असलेल्या नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले
Dipika Chikhlia On Ramayana
Dipika Chikhlia On Ramayana Dainik Gomantak
Published on
Updated on

Dipika Chikhlia Reaction On Ramayan: रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत 'सीते'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सध्या चर्चेत असलेल्या नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, धार्मिक ग्रंथांवर आधारित कथांमध्ये वारंवार बदल करणे योग्य नाही, कारण यामुळे मूळ कथेचा प्रभाव कमी होतो.

'रामायणा'च्या रिमेकबद्दल दीपिकाची नाराजी

दीपिका चिखलिया यांनी रामायणाचे पुन्हा पुन्हा चित्रपट बनवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "प्रामाणिकपणे सांगायचं तर, जे लोक सतत 'रामायण' बनवत आहेत, त्यांच्याबद्दल मी खूप निराश आहे. मला नाही वाटत की तुम्ही असं करायला पाहिजे, यामुळे त्याचा विचका होतोय."

Dipika Chikhlia On Ramayana
Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

पुन्हा पुन्हा रामायण बनवण्यामागे काहीतरी नवीन दाखवण्याची निर्मात्यांची इच्छा असते, यावर दीपिका यांनी बोट ठेवले. त्यांनी ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचे उदाहरण दिले. "जसं कृती सॅनॉनला गुलाबी रंगाची साडी दिली, सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी वेगळा लूक दिला, कारण त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. पण तुम्ही असं करून रामायणाचा मूळ प्रभावच नष्ट करत आहात," असे दीपिका यांनी स्पष्ट केले.

धार्मिक ग्रंथांशी छेडछाड न करण्याचा सल्ला

दीपिका चिखलिया यांनी ठामपणे सांगितले की, "धार्मिक ग्रंथांशी छेडछाड करू नये. मला वाटत नाही की हे करायला पाहिजे, ते जसे आहेत तसेच ठेवा. हे करूच नका." रामायणाव्यतिरिक्त इतर अनेक कथांवर चित्रपट बनवता येऊ शकतात, असेही त्यांनी सुचवले. "अनेक स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोला. इतिहासात असे अनेक अनसंग हिरो आहेत, ज्यांच्या शौर्याबद्दल बोलले जाऊ शकते. फक्त रामायणच का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com