Anurag Kashyap: बॉलीवूडचे कलाकारांच्या आयुष्याचा काही भाग सर्वांसमोर येतो. तर काही आयुष्य नेहमी पडद्यामागे राहते. कधी ते आयुष्य त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून तर कधी एखाद्या मुलाखतीतून समोर येते.
आता बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्ल सांगितले आहे. माझी ओळख पॉर्न साठी होती. लोक मला त्यासाठी ओळखायचे. जेव्हा लोक मला म्हणायचे मी तुमचे चित्रपट पाहिले आहेत. लोक माझे लपूनछपून चित्रपट पाहायचे. 'दॅट गर्ल इन यलो बूट्स' रिलिज झाल्यानंतर माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण झाले होते. हा कसला माणूस आहे ? असे लोक मला म्हणत असत.
या मुलाखतीदरम्यान, त्याच्या अनुराग न रिलीज झालेल्या 'पांच' चित्रपटाबद्दल बोलत होता, तेव्हा त्याने या चित्रपटाची आठवण सांगितली आहे. तो म्हणतो की लोकांनी त्याच्या व्यक्तिरेखेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
अनुरागचा पहिला चित्रपट 'पांच' चित्रपगृहात प्रदर्शित झाला नाही. मात्र चित्रपट ऑनलाइन उपलब्ध आहे. 'पाच'मध्ये के के मेनन, विजय मौर्य, आदित्य श्रीवास्तव, तेजस्विनी कोल्हापुरे आणि जॉय फर्नांडिस यांचा समावेश होता.
'दॅट गर्ल इन येलो बूट्स' मध्ये कल्की कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत आणि 2011 मध्ये रिलीज झाला होता. यात गुलशन देवैयाचीही भूमिका आहे. पियुष मिश्रा आणि रजत कपूर यांनीही चित्रपटात कॅमिओ केला होता.
दरम्यान, अनुरागचा नुकताच 'हड्डी' हा चित्रपट रिलिज झाला आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एक ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येत आहे . अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात मोहम्मद झीशान अय्युब देखील आहेत. 'हड्डी'पूर्वी अनुराग 'धूमकेतू', 'अकिरा', 'दास देव', 'डॉग्स' आणि 'इमाइक्का नोडिगल' या तमिळ चित्रपटासह काही चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.