शाहरुख खानच्या पठानने चित्रपटाचं यश काय असतं? हे दाखवुन दिलं आहे. चित्रपटाला इतका विरोध होऊनही प्रेक्षकांनी शाहरुखचा हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाच्या विरोधात बॉयकॉटचे अभियानही राबवण्यात आले. तरीही चित्रपटाने तुफान कमाई करत देश-विदेशात डंका वाजवला आहे.
विरोधाला न जुमानता, शाहरुख खान-दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट 'पठाण' बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक व्यवसाय करत आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल अनुपम खेर म्हणतात की, चित्रपट चांगला असेल तर त्याचे कोणीही बिघडवू शकत नाही. 'उंचाई'च्या यशानंतर आता अनुपम खेर 'शिवशास्त्री बल्बोवा' या चित्रपटात दिसणार आहेत.
सध्या अभिनेते अनुपम खेर 'शिवशास्त्री बल्बोवा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत बोलताना खेर यांनी बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडबद्दल सांगितले.
"ट्रेंड पाहून कोणीही चित्रपट पाहायला जाणार नाही, चित्रपट चांगला असेल तर त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. द्वेषासाठी चालवल्या जाणार्या ट्रेंडच्या विरोधातही लोक चित्रपट पाहायला जातात. जर त्याला ट्रेलर आवडला तर तो जाऊन चित्रपट बघेल".
अनुपम खेर पुढे म्हणाले, “सिनेमा प्रेक्षकांनी कधीही सिनेमावर बहिष्कार टाकला नाही. जेव्हा लोकांना लॉकडाऊन दरम्यान घरी राहण्यास सांगितले गेले, जे 100 वर्षांनंतर घडले. तेव्हाही लोकांनी घरात मनोरंजनाचे इतर मार्ग शोधले होते. त्यावेळी ओटीटी बाहेर आली. त्यामुळे प्रेक्षकांना भीतीतून मुक्त करण्यासाठी वेळ लागतो."
अनुपम खेर नीना गुप्तासोबत 'शिव शास्त्री बलबोआ' चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. अजय वेणुगोपालन दिग्दर्शित, यात अनुपम खेर आणि नीना व्यतिरिक्त नर्गिस फाखरी आणि शरीब हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.