Pushpa 2 Crew Accident Dainik Gomantak
मनोरंजन

Pushpa 2 Crew Accident: पुष्पा 2 च्या शूटींगच्या टीमचा बस अपघात...जखमी रुग्णालयात दाखल

अभिनेता अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 या चित्रपटाच्या टीमचा बस अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

Rahul sadolikar

Pushpa 2 Crew Bus Acccident: मोस्ट अवेटेड असलेल्या पुष्पा 2 च्या शूटींग टीमच्या बसचा अपघात झाला असुन जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

पुष्पा 2 कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसला तेलंगणातून आंध्र प्रदेशात परतत असताना अपघात झाला. या अपघातात दोन कलाकार जखमी झाले आहेत.

पुष्पा 2 च्या टीमचा असा झाला अपघात

अल्लू अर्जुन -स्टारर पुष्पा: द रुल, ज्याला पुष्पा 2 चे शूटिंग वेगाने सुरू आहे. बुधवारी पुष्पा २ च्या कलाकारांना घेऊन जाणारी बसने तेलंगणाहून आंध्र प्रदेशला परतत असताना थांबलेल्या दुसऱ्या बसला धडक दिली. 

वृत्तानुसार, हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर नरकेटपल्लीजवळ हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोन कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांचा तपास सुरू

बातम्यांनुसार, पुष्पा 2 युनिट बसच्या चालकाला आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस लक्षात आली नाही आणि त्यामुळे ती दुसऱ्या बसला धडकली. अपघातामुळे काही तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताचा पोलिस तपास आधीच सुरू आहे.

 अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

पुष्पा 2 चा तो फर्स्ट लूक

गेल्या नोव्हेंबरमध्ये पुष्पा 2 चा चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टला साहसाची सुरुवात असं कॅप्शनही दिलं होतं. 

एप्रिलमध्ये, निर्मात्यांनी पुष्पाच्या चाहत्यांना एका खास व्हिडिओ केला जे 7 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झाले.

पुष्पा कुठे आहे?

'पुष्पा कुठे आहे' या टायटलच्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की पुष्पा तिरुपती तुरुंगातून गोळ्या झाडून पळून गेला आहे आणि तो फरार आहे. 'पुष्पा कुठे आहे' या प्रश्नाने हा व्हिडिओ संपतो.

व्हिडिओमध्ये, दंगलीचे काही शॉट्स पाहायला मिळतात आणि लोक घाबरून जातात. हे दुस-या भागाचे खरे फुटेज आहे की या व्हिडीओसाठी शूट केले आहे? या प्रश्नाचे उत्तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळेल.

पुष्पा 2 मध्ये असा असेल मसाला

दुसरा भाग अल्लू अर्जुन आणि फहद फाजील यांच्यातला संघर्ष मजेदार असणार आहे. पहिल्या भागाच्या शेवटी मुख्य खलनायक फहाद फाजील प्रेक्षकांच्या समोर आला होता. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील आहे , जी श्रीवल्लीची भूमिका करते पहिल्या भागातल्या तिच्या कामाचे तिच्या चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं. या दान्ही भागांचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

पुष्पा: द राइजमध्ये, अर्जुनने 'ठगघे ले' हे कॅचफ्रेज लोकप्रिय केले. गेल्या वर्षी, त्याने एका कार्यक्रमात दुसऱ्या भागासाठी नवीन कॅचफ्रेज सादर केला. तो म्हणाला की मला आशा आहे की या चित्रपटासाठी त्याला असलेली उत्सुकता चाहत्यांना देखील असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 6 भाकितं ठरली खरी, भविष्यातील धोक्यांकडे जगाचे वेधले लक्ष; 2026 वर्षाबाबत सतावू लागली चिंता

Amanda Wellington: "मला भारताकडून क्रिकेट खेळायचंय..." दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान चर्चेत VIDEO

Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

Writing History: माती, दगड आणि हाडे अशा वस्तूंवर चिन्हे कोरून, खुणांद्वारे विकसीत झालेली 'लेखनकला'

Rohit Sharma New Look: 'मुंबईच्या राजा'चा फिटनेस पाहून चाहते थक्क! तरुणांनाही लाजवेल असा रोहितचा नवा लूक!

SCROLL FOR NEXT