South Superstar Allu Arjun Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun Fees: पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जूनने वाढवली इतकी फी; 35 लाख नव्हे तर ...

Allu Arjun Fees: यामध्ये कोका-कोला, केएफसी, झोमॅटो आणि रेड बस यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

Allu Arjun Fees: तेलुगू चित्रपट 'पुष्पा'चा दुसरा भाग लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी पुष्पा २ चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या त्याचे शूटिंग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. आता मात्र अल्लू अर्जून किती फी घेतो याची चर्चा सुरु झाली आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या ब्रँड एंडोर्समेंट फीमध्ये 17 पट वाढ केली आहे.

अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'मध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागासाठी तो 35 कोटी रुपये घेत होता, मात्र आता जाहिरातींसाठी तो दररोज 6 कोटी रुपये घेत आहे. असे सांगितले जात आहे की या व्यतिरिक्त, इतर अनेक दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांची फी 8 पट वाढवली आहे.

'पुष्पा: द राइज'च्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता वाढली आहे. तो अनेक प्रसिद्ध ब्रँडचा चेहरा बनला आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अलीकडेच त्याने आणखी 6 नवीन ब्रँडशी करार केले आहेत. यामध्ये कोका-कोला, केएफसी, झोमॅटो आणि रेड बस यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.

दरम्यान, अभिनेत्याने पान मसालाची जाहिरात नाकारली होती. त्यासाठी त्याला 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण अभिनेत्याने ते करण्यास नकार दिला. केजीएफ फेम यशनेही हे केले. या कलाकारांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या प्रेक्षक आणि चाहत्यांना कोणताही चुकीचा संदेश द्यायचा नाही. तसेच, जेव्हा ते प्रोडक्ट वापरत नाहीत तेव्हा त्याची अॅडव्हर्टाइस करणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

SCROLL FOR NEXT