इफ्फी फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर, 6 भाषांमधल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांची निवड

निवड झालेल्या सर्व चित्रपटांमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत.
54th International Film Festival India Goa
54th International Film Festival India GoaDainik Gomantak
Published on
Updated on

54th IFFI Goa Film Baazar: गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु माहितीपट, माहितीपट, भयपट आणि कथात्मक अॅनिमेशन पट असं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे.

या सर्व चित्रपटांमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत.

यात पितृसत्ता, शहरांमधला असंतोष, बिकट गरिबीची स्थिती, हवामानविषयक संकटे, राष्ट्रवाद तसेच खेळ / आरोग्यविषयक तंदुरुस्ती अशा विविध विषयांना स्पर्ष केला गेला आहे. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंड भाषा) भाषांमध्ये आहेत, ज्यातून विविध विषयांचं सर्वसमावेषक चित्रण पाहायला मिळतं.

एएनयू (14 मिनिटे), दिग्दर्शिक - पुलकित अरोरा (इंग्रजी/हिंदी/माओरी):

पतीच्या मृत्यूमुळे वैधव्य आलेली एक महिला न्यूझीलंडहून भारतात येते. जवळपास वर्षभरापूर्वीच तिने आपल्या पतीला गमावले आहे. मात्र ती अजुनही आपल्या जोडीदाराच्या सहवासाच्या आठवणींमध्येच गुंतलेली आहे. पण तिला अचानकपणे कल्पनातीत संकटाचा सामना करावा लागतो, आणि याच दरम्यानच्या विलक्षण घडामोडी तिला पतीला गमावल्यानं साचून राहिलेल्या दु:खालाही सामोरे जाण्यास भाग पाडतात.

रोटी कून बनासी अथवा हू विल बेक द ब्रेड (25 मिनिटे), दिग्दर्शक चंदनसिंग शेखावत (मारवाडी) :

हे राजस्थानमधल्या एका ग्रामीण घरातले कथानक आहे. हू विल बेक द ब्रेड? हा चित्रपट संतोष या व्यक्तिरेखेची कथा मांडतो. तो चित्रपटातील रूपा या पात्राचा पती आणि रणजित या पात्राचा मोठा मुलगा आहे. या कथेतील संतोष ही व्यक्तिरेखा म्हणजे पितृसत्ता आणि पुरुषत्व या आपल्याकडील पारंपरिक धारणांमध्ये अडकलेले पात्र आहे. 

54th International Film Festival India Goa
IFFI : 54 वा ‘इफ्फी’ प्रत्येकाला आपलासा वाटावा ! अंकिता शर्मा

ट्युजडे वुमन (29 मिनिटे), दिग्दर्शक इमाद शाह (इंग्रजी) :

एक रमणीय सकाळील आपला नायक, शास्त्रीय संगीताचा आनंद घेत स्टोव्हवर उकळी आलेल्या स्पॅगेतीला शांतपणे ढवळत शिजवत असतो. त्याचवेळी त्याला आलेल्या दूरध्वनी कॉलच्या रिंगमुळे या रम्य क्षणांची तार तुटते. पण तो जेव्हा हा कॉल स्विकारून बोलू लागतो, तेव्हा त्याच्या कानावर एक सौम्य, हळुवार आवाजातले एका स्त्रीचे स्वर ऐकू येतात. मात्र हा आवाज त्याच्या ओळखीचा नसतो.

गिध्ध (25 मिनिटे), दिग्दर्शक मनीष सैनी (हिंदी):

ही उदरनिर्वाह आणि रोजच्या जगण्यासाठी धडपणाऱ्या एका म्हाताऱ्या व्यक्तीची कथा आहे. हे पात्र आपल्या जवळ आलेल्या मृत्यूपासून वाचू शकत नसण्याच्या स्थितीत जगत असते. त्याच्याकडे अवघे काही रुपये शिल्लक असतात, ज्याचा वापर करून तो औषधे किंवा खाण्यासाठीच्या काही गोष्टी यांपैकी काहीतरी एकच खरेदी करू शकत असतो. उपासमारीचा सामना करत असलेली ही व्यक्ती जर्जर झालेली असल्याने त्याच्यात कुठलंही काम करण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच त्याला काम मिळणेही अवघड असते.

गोपी (14 मिनिटे), दिग्दर्शन - निशांत गुरुमूर्ती (कन्नड) :

गोपी सिद्दी या एक मध्यमवयीन कथाकार आहेत. आपण सिद्दी या समुदायाशी (दक्षिण भारतातील आफ्रिकी नागरिकांचा समुदाय) जोडल्या असल्याचे त्या सांगतात. तोंडी कथाकथन करण्याचा पारंपरिक कलेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आपणच आपल्या कथा प्रकाशित कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी सर्वात आधी तिला प्रथम अलिप्तता, सामाजिक स्तर आणि पर्यावरणीय आपत्तींसोबत लढा द्यावा लागतो.

आयर्न वुमन ऑफ मणिपूर (26 मिनिटे), दिग्दर्शन - होबन पबन कुमार (मणिपुरी/इंग्रजी) :

हा चित्रपट म्हणजे आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीत भरीव योगदान देणाऱ्या खेळाडूंना वाहिलेली आदरांजलीच आहे. कुंजाराणी देवी (पद्मश्री पुरस्कार विजेती, 2011), अनिता चानू (ध्यानचंद पुरस्कार विजेती) आणि मीराबाई चानू (पद्मश्री पुरस्कार 2018 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील रौप्यपदक विजेती) या महिला भारोत्तोलन खेळाडूंच्या प्रेरणादायी कथांनी भारतीय खेळाडूंच्या आणि एकूणच देशाच्या अनेक पिढ्यांना प्रेरीत केले आहे.

54th International Film Festival India Goa
IFFI Goa 2023: टोरंटोनंतर उर्वशीचा ‘ऐ दिल है ग्रे’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छळकणार

व्हेअर माय ग्रँडमदर लिव्हज (51 मिनिटे), दिग्दर्शन - तस्मिया आफरीन मौ (बंगाली) :

चित्रपट निर्मात्या मौ त्यांच्या लाडक्या नानूच्या घरी तिचे चित्रीकरण करण्यासाठी जातात. नानू यांनी 27 वर्षांपूर्वी आपल्या पतीला गमावले असून, त्यांच्या निधनानंतर त्या आपल्या 100 वर्षे जुन्या घरात एकट्याच राहात आहेत. 

लडाख 470 (38 मिनिटे), दिग्दर्शन - शिवम सिंग राजपूत (हिंदी/इंग्रजी):

धावण्याच्या क्षेत्रात पाच गिनीज वर्ल्ड रनिंग रेकॉर्ड प्राप्त केलेली, राजस्थानच्या अजमेर इथली धावपटू सुफिया तिच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रयत्नासाठी सज्ज असते. ती धावण्याचे असे आव्हान पेलण्यासाठी तयारी करत असते, की जसे आजवर कोणीही पेललेले नाही.

द एक्सलेशन (भयपट) – (82 मिनिटे), दिग्दर्शक - सन्मान रॉय (बंगाली):

या चित्रपटात बंगालमधील एका खेड्यातील गौरंगा या तरुणाची कथा मांडली आहे. या तरुणाने नुकतीच आपली पत्नी गमावली आहे. खरे तर त्याचे वर्षानुवर्षे त्याचे कुटुंब असख्य दु:खांच्या मालिकेच्या सामना करत असतानाच त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळतो, आणि त्यामुळे गौरांगाच्या मनस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि या दुःखातून सावरणे त्याला कठीण होऊन बसते.

रिटर्न ऑफ द जंगल (अ ॅनिमेशन) – (105 मिनिटे), दिग्दर्शक - वैभव कुमारेश (हिंदी) : 

9 वर्षांचा मिहीर आणि त्याच्या शाळेतल्या मित्रांसमोर, त्यांच्यापेक्षा मोठा असलेल्या आणि आडदांड वृत्तीच्या राहुल मल्होत्राला पराभूत करण्याचे कठीण आव्हान आहे. त्यांच्या या अशक्यप्राय आव्हानात त्यांच्याच  शहरातले थाथा हे आनंदी आणि मिश्कील स्वभावाचे आजोबा आणि त्यांच्याकडच्या जंगलावर आधारीत प्रेरणादायी गोष्टी त्यांना मदत करत असतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com