Narendra Nath Rajdan Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Narendra Nath Razdan Passes Away: आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचे निधन

अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि महेश भट्ट यांचे सासरे नरेंद्रनाथ राजदान यांचे नुकतेच निधन झाले आहे.

Rahul sadolikar

Narendra Nath Razdan Passes Away: अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राजदान यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे नुकतेच निधन झाले आहे.

आपल्या लाडक्या आजोबांच्या निधनाने आलिया भट्ट प्रचंड दु:खात आहे'. गुरुवारी(1 जून) आलियाने इंस्टाग्रामवर आजोबा नरेंद्र नाथ राजदान यांच्या निधनाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअ केली आहे. नरेंद्रनाथ राजदान ते 94 वर्षांचे होते.

आलियाने शेअर केल्या जुन्या आठवणी...

आपल्या 92 व्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर करत आलियाने खूप सुंदर कॅप्शन लिहिले होता.ते स्वत: खूप काही करू शकले आणि तिची मुलगी राहासोबत ते खेळले हे तिने लिहिले होते . "माझे आजोबा. माझा हिरो. ९३ वर्षांपर्यंत गोल्फ खेळले.

वयाच्या 93 वर्षांपर्यंत काम केले. चांगले ऑम्लेट बनवले. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. व्हायोलिन वाजवले. आपल्या नातवासोबत खेळले. त्यांचे क्रिकेट आवडले, त्याचे स्केचिंग आवडले. त्यांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत..

आलिया पुढे लिहिते, त्यांनी त्यांच्या आयुष्यावर प्रेम केले! माझे हृदय दु:खाने भरलेले आहे, पण आनंदानेही भरलेले आहे.. कारण माझ्या आजोबांनी जे काही केले ते आम्हाला आनंद देत आहे आणि त्यासाठी त्यांनी सुंदर पद्धतीने आम्हाला वाढवल्याबद्दल धन्य आणि कृतज्ञ वाटते! जोपर्यंत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत,”

93 व्या वाढदिवसाचा तो व्हिडीओ

व्हिडिओमध्ये आलियाचे आजोबा त्याच्या वाढदिवसाचा केक कापताना त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत दिसत आहे.या व्हिडीओत रणबीर कपूरही दिसतो आणि तो केकवर मेणबत्ती लावायला मदत करण्यासाठी पुढे येतो.

या पोस्टवर बॉलीवूडचे आलियाचे मित्र आणि चाहत्यांकडून शोकसंदेश आले. करण जोहरने या पोस्टवर दु:ख व्यक्त केले आहे.” एका चाहत्याने लिहिले, “त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”

आलिया आजोबांसाठी आयफाला गेली नाही

आलियाने आयफा २०२३ मध्ये गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला ;पण तिच्या आजोबांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आलियाला अवॉर्ड शोमध्ये उपस्थित राहता आले नाही, तिच्या वतीने हा पुरस्कार दुसऱ्याच व्यक्तीने स्वीकारले. तिने नंतर या सन्मानासाठी अवॉर्ड शोचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली.

नरेंद्रनाथ राजदान उत्तम व्हायोलिन वादक

आपल्या वडिलांबद्दल बोलताना, काही वर्षांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, सोनी राजदान म्हणाल्या होत्या, “बाबा एक अत्यंत हुशार व्हायोलिन वादक होते, अगदी येहुदी मेनुहिन यांच्याकडूनही त्यांचं कौतुक झालं होतं . म्हणून, एक विद्यार्थी असतानाही, ते प्रतिष्ठित शास्त्रीय भारतीय नृत्यांगना राम गोपाल यांच्या ग्रुपसोबत संपूर्ण युरोपमध्ये फिरायचे. 

वडिलांची आठवण

पुढे बोलताना सोनी राजदान वडिलांनी लंडनमधील त्यांच्या एका मैफिलीसाठी कोणालातरी आमंत्रित केले होते, आणि ते करू शकत नसल्यामुळे, त्यांनी माझ्या आईला पासेस दिले होते, तिने बॅकस्टेजवर जावे आणि कार्यक्रमानंतर मिस्टर राझदान यांचे आभार मानले पाहिजेत. तेव्हा ते भेटले आणि त्याने तिला कॉफीसाठी बोलावले..."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT