Alia Bhatt Pregnant News Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt Twins: आलिया-रणबीरच्या घरी एक नाही, तर येणार दोन पाहुणे

सोशल मीडियावर रणबीर-आलिया ट्विन्सची अपेक्षा करत असल्याच्या बातम्या व्हायरल

दैनिक गोमन्तक

आलिया-रणबीर कपूरच्या घरी एक नाही तर दोन छोटे पाहुणे येणार आहेत. होय, सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत की रणबीर-आलिया (Alia bhatt & Ranbir kapoor) ट्विन्सची अपेक्षा करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची प्रेमकहाणी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय प्रेमकथांपैकी एक म्हणून गणली जाते. दोघांनीही गुपचूप लग्न केले असले तरी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांनंतर, आलिया भट्टने स्वतः तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि आता बातम्यांवर विश्वास ठेवला तर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना जुळी मुले होणार आहेत.(Alia Bhatt Pregnancy First Child)

आलियाच्या घरी एक नाही तर दोन पाहुणे येणार

रणबीर कपूरच्या घरी एक नाही तर दोन छोटे पाहुणे येणार आहेत. होय, सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जुळ्या मुलांची अपेक्षा करत आहेत. तथापि, या वृत्तांची पुष्टी तेव्हाच होईल जेव्हा हे जोडपे स्वतः याबद्दल घोषणा करतील. मात्र, रणबीर आणि आलियाची घोषणा होण्यापूर्वीच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. तर काही सोशल मीडिया यूजरनी कॉमेंटस लिहल्या आहेत. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, 'हे दोघे किती भाग्यवान आहेत. भरपूर प्रेम.' दुसर्‍या युजरने लिहिले, 'व्वा हे आश्चर्यकारक आहे.' 'ये जवानी है दिवानी रिपीट होत आहे' अशी कमेंट एका व्यक्तीने केली. तर एका मुलीने कमेंट केली, 'ही मुलगी मी पाहिलेले स्वप्न पूर्णपणे जगत आहे.' अनेक यूजर्सने आलिया भट्टला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर काही युजर्सनी यासाठी आलिया भट्टला ट्रोल देखील करायला सुरुवात केली आहे.तर एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - दुसरा कोणाचा आहे? आणखी एका यूजरने लिहिले, 'एक रणवीर सिंग का है क्या?' आलिया भट्ट आणि रणवीर सिंग कॉफी विथ करणमध्ये एकत्र दिसले होते आणि दोघांची मैत्री खूप चांगली आहे.

'ब्रह्मास्त्रा'बाबत चाहते उत्सुक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असेल आणि या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर शिवाची तर आलिया भट्टने ईशाची भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT