अभिनेत्री आलिया भट्ट लग्नाआधीच होती प्रेग्नंट - करण जोहर

ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती का ? अशा चर्चा सोशल मीडियावर व्हायरल
Karan Johar
Karan JoharDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या प्रेम संबंधामूळे बरीच प्रकरणे चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर करण जोहर याने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आलिया भट्ट काही दिवसांपासून प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे. या चर्चेत ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय ? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. यातच करण जोहरने एका मुलाखतीत आलिया खरंच लग्नाआधी प्रेग्नंट होती असे म्हटले आहे. (Alia bhatt pregnant before marriage karan johar reveal the truth)

Karan Johar
Ponniyin Selvan: मणिरत्नमच्या 500 कोटींच्या चित्रपटाचा Teaser Out, ऐश्वर्याची दमदार एंट्री

माझ्या लग्नाची बातमी ऐकून करण रडत होता

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली यावेळी तिने करण जोहरला लग्नाची बातमी दिली तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती असं विचारलं असता यावर आलिया म्हणाली की, “मी जेव्हा त्याला माझ्या लग्नाबाबत सांगायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा त्याचा ‘बॅड हेअर डे’ होता.

त्याचे केस सेट होत नव्हते आणि तो वैतागलेल्या अवस्थेत डोक्याला हेअर कॅप लावून बसला होता. मी त्याला सगळं काही सांगून झाल्यावर लग्न करणार असल्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. एका हातात कॉफीचा कप घेतलेला करण जोहर माझ्या लग्नाची बातमी ऐकून अक्षरशः रडत होता.” असं ती म्हणाली.

Karan Johar
बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये रॅम्बोचा 'वाइल्ड' जलवा; दिसला किडे खाताना - Video

करण जोहर याने गेल्या काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियाच्या प्रेग्नन्सीची बातमी समजल्यानंतर काय प्रतिक्रिया होती हे स्पष्ट करताना हाच ‘बॅड हेअर डे’चा किस्सा सांगितला होता.

यावेळी करण म्हणाला की, “मला आठवतंय त्या दिवशी माझा ‘बॅड हेअर डे’ होता. मी कॅप लावून, हूडी घालून बसलो होतो आणि आलिया माझ्या ऑफिसमध्ये आली होती. तिने मला तिच्या प्रेग्नन्सीविषयी सांगितलं आणि माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की माझ्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलीला मी माझं बाळं मानतो, तिचं बाळं या जगात येणार असल्याची वेगळाच आनंद होता.” करणच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ आलियाच्या लग्नाच्या किस्स्याशी जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com