Alia Bhatt Video: मुंबई एअरपोर्टवरील आलिया-रणबीरचा व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt- Ranbir Kapoor Video: 'हार्ट ऑफ स्टोन' हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून आलिया भट्ट रविवारी भारतात परतली आहे.
Ranbir and Alia Bhatt
Ranbir and Alia BhattDainik Gomantak

बॉनिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून रविवारी मुंबईत परतली आहे. आलियाला घेण्यासाठी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुंबई विमानतळावर गेला होता. रणबीर कपूर विमानतळाबाहेर कारमध्ये तिची वाट पाहत होता. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून, खूप दिवसांच्या दुराव्यानंतर रणबीर कपूरला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक दिसत होती. आलिया भट्ट जेव्हा विमानतळावरून बाहेर पडत होती तेव्हा तिची नजर फक्त रणबीर कपूरला शोधत होती. रणबीर दिसताच तिने त्याला मिठी मारली.

रणबीर कपूरला पाहून आलियाला प्रचंड आनंद झाला होता. तिने त्याच्याकडे पाहून जोरात 'बेबी' असा आवाज दिला. रणबीरकडे जात तिने त्याला मिठी मारली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर या वर्षी लग्नबंधनात अडकले. लवकरच ते दोघे आई-बाबा बनणार आहेत. सेलिब्रेटी फोटोग्राफार विरल भयानी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Ranbir and Alia Bhatt
Alok Nath B'Day: ‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ ची ओळख

आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) हा हॉलिवूड चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच आलियाने या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासह हॉलिवूड अभिनेत्री गैल गेडोट आणि जेमी डोर्नन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन टॉम हार्परने सांभाळली आहे.

'हार्ट ऑफ स्टोन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला, तर या चित्रपटाचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या सीक्वेलमध्येही आलिया मुख्य भूमिकेत दिसेल. आलिया आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, रणवीर सिंहसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'डार्लिंग्स' हे चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com