Alia Bhatt Darlings Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt Darlings: आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'चा नेटफ्लिक्सवर विक्रम

Netflix Film Darlings: आलिया भट्टचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, या चित्रपटाने आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'डार्लिंग' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 5 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. ज्यामध्ये आलियासोबत अभिनेता विजय वर्मा दिसला होता. रिलीज झाल्यानंतर, हा चित्रपट Netflix वरील सर्वात मोठा नॉन-इंग्रजी भाषेचा भारतीय ओपनर म्हणून उदयास आला आणि 16 देशांमध्ये टॉप-10 मध्ये राहिला. यासोबतच त्याच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

* 'डार्लिंग' चा विक्रम

डार्लिंग्सने (Darlings) आता आणखी एक नवीन विक्रम केला आहे. ज्याची माहिती नेटफ्लिक्स इंडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आलिया भट्टचा (Alia Bhatt) हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर 'सर्वात जास्त पाहिलेला नॉन-इंग्रजी भारतीय मूळ चित्रपट' बनला आहे. तो आतापर्यंत 24 दशलक्ष म्हणजेच 2 कोटी 40 तास पाहिला गेला आहे.

* लोकांना चित्रपट आवडला

कौटुंबिक हिंसाचाराच्या कथेवर आधारित या चित्रपटात (Movie) आलियाने 'बद्रुनिसा उर्फ ​​बद्रू' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचबरोबर विजय वर्मा तिच्या पतीच्या 'हमजा'च्या भूमिकेत आहे. आणि दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात (Movie) तिने शेफाली शाहही दिसली असून ती आलियाच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते अभिनयापर्यंत लोकांना खूप आवडला असुन यामुळेच चित्रपट एकापाठोपाठ एक अनेक विक्रम करत आहे.

नेटफ्लिक्सवर रेकॉर्ड बनवण्यासोबतच आलिया भट्टचा 'डार्लिंग्स' कमाईच्या बाबतीतही मागे राहिलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, त्याचे OTT राइट्स जवळपास 80 कोटींच्या किंमतीला विकले गेले आहेत. विशेष म्हणजे या माध्यमातून आलियाने निर्माती म्हणूनही तिच्या करिअरला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT