DoBaaraa: Taapsee Pannuचा 'दोबारा' बॉक्स ऑफिसवर आपटला, पहिल्या दिवशी फक्त 72 लाखांची कमाई

Taapsee Pannu स्टारर चित्रपट DoBaaraa रिलीज झाला आहे आणि पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.
DoBaaraa Box Office Collection
DoBaaraa Box Office CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

DoBaaraa Box Office Collection: Taapsee Pannu स्टारर चित्रपट DoBaaraa रिलीज झाला आहे आणि पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी एक कोटींचा आकडाही पार केला नाही. ()

DoBaaraa Box Office Collection
Emergency: कंगना राणौतच्या चित्रपटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारणार महिमा चौधरी

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केवळ 72 लाखांची कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत. एकापाठोपाठ एक अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. यामध्ये आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्या ए-लिस्टर्स कलाकारांचा समावेश आहे.

तापसी पन्नूचा चित्रपटही काही काळापासून सुरू असलेला हा ट्रेंड बदलू शकलेला नाही. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे अनेक शो रद्द करावे लागले आणि चित्रपटाची व्याप्ती खूपच कमी होती. दोबारा हा 2018 च्या स्पॅनिश चित्रपट मिराजचा रिमेक आहे.

बॉयकॉटवर तापसीचे मत

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांनी बहिष्काराच्या ट्रेंडवर आणि हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनावर भाष्य केले होते. बॉलीवूडमध्ये बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तापसीने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "कृपया सर्वांनी आमच्या दोबारा चित्रपटावर बहिष्कार टाका.

मला आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन आवडतो. मला लीगमध्ये राहायचे आहे. त्यातच भर घालत अनुराग म्हणाला, "हो प्लीज, मला आमचा चित्रपट बॉयकॉट हॅशटॅगवर ट्रेंड करायचा आहे. कारण मला हे जाणून घ्यायचे आहे की जे लोक बहिष्काराचे आवाहन करतात तेच लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहतात का?" असा प्रश्नही अनुराग कश्यपने उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com