OMG 2 Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

OMG 2 Box Office Collection : ट्रोलींगचा सामना करत OMG 2 जोमात... बॉक्स ऑफिस कलेक्शन एकदा पाहाच...

अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला OMG 2 बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वात चाललेली चर्चा अभिनेता अक्षय कुमार आणि सनी देओलभोवती फिरत आहे. अक्षय कुमारचा OMG 2 आणि सनी देओलचा बहुचर्चित गदर 2 एकाच दिवशी रिलीज झाल्यामुळे चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचल्या होत्या.

ओ माय गॉड वर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करुन अभिनेता अक्षय कुमारला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आले, त्यामुळे चित्रपटाची भलतीच उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसले. OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठी हे भगवान शिव भक्त आहेत. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार देवाच्या मेसेंजरच्या भूमिकेत दिसत आहे तर यामी गौतम एका वकिलाच्या भूमिकेत आहे.

OMG 2 ची कमाई

अमित राय दिग्दर्शित OMG 2 ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. Sacnilk.com नुसार , चित्रपटाने शनिवारी 14.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटात अक्षय कुमार , पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sacnilk.com च्या मते, OMG 2 ने सुरुवातीच्या अंदाजानुसार दुसऱ्या दिवशी ₹ 14.50 कोटी निव्वळ कमाई केली. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ₹ 24.76 कोटी आहे.

तगडे कलाकार

OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठी हे कांती शरण मुद्गल नावाच्या शिवभक्ताच्या भूमिकेत आहेत. त्याचे पात्र आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध कायदेशीर लढाई लढताना दिसत आहे. अक्षय देवाच्या दूताच्या भूमिकेत दिसत आहे तर यामी गौतम एका वकिलाच्या भूमिकेत आहे.

चित्रपटाचा विषय

Viacom18 Studios द्वारे प्रस्तुत, OMG 2 ची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्स आणि वाकाओ यांनी केली आहे. चित्रपट किशोरवयीन मुलांचे विविध प्रश्न आणि लैंगिक शिक्षणाचे महत्त्व या प्रश्नालाही स्पर्श करतो. अक्षय आणि परेश रावल अभिनीत OMG - ओह माय गॉड या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ओ माय गॉडचा पहिला भाग 2012 मध्ये रिलीज झाला होता.

पंकज त्रिपाठी

चित्रपटात मुले आणि पालकांच्या दरम्यान टाळल्या जाणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे. चित्रपट आपल्या पात्रांद्वारे दर्शविण्याचा नवा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचतो.

चित्रपटाची कथा खूप लांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही, आणि लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यावर दिग्दर्शकाचा भर राहिला आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्ट बरोबरच, OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठीचे काम उल्लेखनिय आहे.

पंकज त्रिपाठी म्हणतात

या अभिनेत्याने अलीकडेच पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "मी उत्तर बिहारचा आहे आणि यामी हिमाचल प्रदेशची आहे. आम्ही मजबूत, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीतून आलो आहोत.

आमच्या पार्श्वभूमीमुळे मग ते सोशल ड्रामा असो किंवा थ्रिलर. चित्रपटाचा प्रेक्षकावर काय परिणाम होईल याची आम्ही जाणीव ठेवतो. अभिनेते म्हणून, आम्ही नेहमीच जागरूक असतो, कारण आम्ही शहरी आणि ग्रामीण जीवन दोन्ही जवळून पाहिले आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT