Akshay Kumar-Shanti Priya: 30 चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीला अक्षय कुमार का म्हणाला 'तू हिरॉइन होऊ शकत नाही'

Akshay Kumar: 1991 आलेल्या 'सौंगध' या चित्रपटात अक्षय कुमार आणि शांती प्रिया यांनी एकत्र काम केले होते.
Akshay Kumar-Shanti Priya
Akshay Kumar-Shanti PriyaDainik Gomantak
Published on
Updated on

Akshay Kumar: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या ओएमजी २ मुळे मोठ्या चर्चेत आहे. हा चित्रपट अक्षयच्या करिअरला नवी उभारी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता मात्र अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे तर अभिनेत्री शांती प्रियाने त्याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

1991 आलेल्या सौंगध या चित्रपटात अक्षय कुमार आणि शांती प्रिया यांनी एकत्र काम केले होते. दोघांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आता शांती प्रियाने अक्षय कुमारने तिला तू हिरॉइन म्हणून काम करु शकत नाहीस असे म्हटल्याचे वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, शांती प्रियाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. लग्नानंतर शांती प्रियाने अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने आपल्या मुलांसाठी कोणताही चित्रपट स्विकारला नाही.

मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर तिला जेव्हा अभिनयक्षेत्रात परत यायचे होते, तेव्हा तिने अक्षय कुमारबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. याबरोबरच, तिने बॉलीवूडमध्ये आपल्यासाठी काही काम मिळू शकते यासाठी अक्षयला मेसेज केला होता. मात्र त्या मेसेजला अक्षयने कोणताही रिप्लाय दिला नसल्याचे तिने म्हटले आहे. तेव्हा मी दुखावले गेले होते, असे शांती प्रियाने म्हटले आहे.

Akshay Kumar-Shanti Priya
Amir Khan Controversy : आमिर हे बरं नाही! चीनच्या मुद्द्यावरुन आमिर का होतोय ट्रोल?

अक्षयबरोबरच्या झालेल्या भेटीबद्दल बोलताना ती म्हणते, मी अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या हॉलीडे च्या सेटवर भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा अक्षयने माझी, माझ्या कुटुंबाची चौकशी केली. सोनाक्षी सिन्हा बरोबर ओळख करुन देताना मी त्याची पहिली हिरॉइन असल्याचे त्याने सांगितले. पुढे बोलताना मी त्याला सांगितले की, मला इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करायचे आहे.

कोणता चांगला प्रोजेक्ट असेल तर मला कळवण्यास सांगितले. त्यावर अक्षयने मला समजावले की, मी आजही तशीच दिसते मात्र आता तू हिरॉइनची भूमिका निभावू शकणार नाही. इंडस्ट्रीमध्ये लग्न झाल्यानंतर महिलांना चांगली वागणूक दिली जात नाही.

त्यापेक्षा तू साऊथ इंडस्ट्रीमध्ये का ट्राय करत नाही असेही विचारले मात्र माझे कुटुंब मुंबईत असल्याने मी तिकडे जात नसल्याचे सांगितले. आमचा हा संवाद साधारण अर्धा तास सुरु होता असेही ती म्हणते.

दरम्यान, शांती प्रियाने ३० चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आता एक मोठ्या ब्रेकनंतर तिला इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करायची इच्छा असल्याचे शांती प्रियाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com