Ajmer Dargah Khadim Sarwar Chishti  Dainik Gomantak
मनोरंजन

Ajmer 92 Film: लडकी चीज ही ऐसी है... अजमेर दर्ग्याचे खादिम सरवर चिश्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य; Video

Ajmer 92 Film: 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरुन देशभरात वांदग निर्माण झाल्यानंतर अता त्याच्यात पंक्तीत बसणाऱ्या अजमेर 92 चित्रपटाबाबत वाद सुरु झाला आहे.

Manish Jadhav

Ajmer 92 Film: 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरुन देशभरात वांदग निर्माण झाल्यानंतर अता त्याच्यात पंक्तीत बसणाऱ्या अजमेर 92 चित्रपटाबाबत वाद सुरु झाला आहे. या चित्रपटाबाबत मुस्लिम संघटना आणि समाजातील लोक सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.

यातच, अजमेरमध्ये खादिमांच्या संघटनेचे सचिव यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संस्थेचे सचिव सरवर चिश्ती यांनी या चित्रपटाबाबत सांगितले की, मुलगी ही अशी गोष्ट आहे की, भले-भले लोक भरकटतात. विश्वामित्रही भरकटला होता.

दरम्यान, सरवर चिश्ती यांनी 4 जून रोजी हे वादग्रस्त विधान केले आहे. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सरवर चिश्ती असे म्हणताना ऐकू येत आहे की, पैसा आणि मूल्यांनी माणूस भ्रष्ट होऊ शकत नाही.

पण, मुलीची गोष्ट अशी आहे की भल-भले लोक भरकटतात. विश्वामित्रही असाच भरकटला होता. आज जे बाबा तुरुंगात आहेत ते फक्त मुलींच्या बाबतीत अडकलेले आहेत.

देशातील स्त्री शक्तीचा अपमान

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अजमेर महानगरपालिकेचे उपमहापौर नीरज जैन यांनी सरवर चिश्ती यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले- चिश्ती यांचे हे विधान त्यांची महिलांबाबतची (Women) अशिक्षित आणि घाणेरडी मानसिकता दर्शवते. ते स्त्रियांना उपभोगाची वस्तू मानतात. हा थेट देशातील स्त्री शक्तीचा अपमान आहे.

जैन पुढे म्हणाले- आधी अजमेर ब्लॅकमेल प्रकरणातील गुन्हेगारांना राजकीय डावपेचातून वाचवण्याचे षडयंत्र रचले गेले. आता चिश्ती धार्मिक भावनांशी संबंधित धार्मिक कार्ड खेळत आहेत. चिश्ती यांच्या वक्तव्यावर खादिम समाज आणि राजस्थान पोलिसांनी (Police) कायदेशीर कारवाई करावी.

चिश्ती यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे

खादीम संघटनेचे अंजुमन सय्यद जदगनचे सचिव सरवर चिश्ती यांचा वादांशी जुना संबंध आहे. यापूर्वी कन्हैलाल हत्याकांडानंतरही चिश्ती यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी एनआयएने सरवरची चौकशीही केली आहे. याशिवाय, सरवर चिश्ती यांच्यावर पीएफआयशी संबंध असल्याचाही आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT