Ajmer 92 : 'कश्मिर फाईल्स', 'केरळ स्टोरी'नंतर आता 250 मुलींची गोष्ट सांगणारा हा चित्रपट सापडेल का वादाच्या भोवऱ्यात?...

द कश्मिर फाईल्स आणि द केरळ स्टोरीनंतर आता अजमेर 92 हा चित्रपट नवी गोष्ट घेऊन येत आहे.
Ajmer 92
Ajmer 92Dainik Gomantak

गेले काही दिवस देशात चित्रपट आणि वाद हे समीकरण नित्याचंच झाले आहे. कश्मिर फाईल्स पठाण, द केरळ स्टोरी यानंतर पुन्हा आगामी डायरी ऑफ बंगाल या चित्रपटाचा रिलीज आधीच सुरू असलेला वाद ही त्याचीच उदाहरणं आहेत. या चित्रपटानंतर आता अजमेर 92 हा नवा चित्रपट वादात सापडण्याची शक्यता आहे.

चित्रपटांचे वाद देशातल्या लोकांना काही नवीन नाहीत मग तो विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स असो किंवा सुदीप्तो सेनचा द केरळ स्टोरी  असो , दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले पण चित्रपटांचा बराच काळ चाललेला वादही तितकाच गाजला. काश्मीर फाइल्सने 250 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर केरळ स्टोरीही लवकरच हा आकडा पार करणार आहे.

अजमेर 92 हा नवा चित्रपट

काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कहाणी दाखवण्यात आली होती. दुसरीकडे, द केरळ स्टोरीबाबत, दिग्दर्शकाने असा दावा केला आहे की हा चित्रपट केरळमधील एका सत्य घटनेवर आधारित आहे.

केरळमधील 30,000 हून अधिक मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करुन त्यांना इसिससारख्या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं अशी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची गोष्ट होती. काश्मीर आणि केरळनंतर आता अजमेरच्या कथेवर चित्रपट येणार आहे.

अजमेरच्या सत्य घटनेवर चित्रपट असल्याचा दावा

अजमेरच्या एका सत्य घटनेवर नुकताच चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'अजमेर 92' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे, ज्याचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह करत आहेत आणि उमेश कुमार तिवारी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे.

250 मुलींची गोष्ट

अजमेर 92 चे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या पोस्टरवरुन चित्रपटाची गोष्ट समोर आली आहे.या पोस्टरवर अनेक वृत्तपत्रांच्या कटिंग्ज दिसतायत ज्यामध्ये अनेक मोठ्या आणि खळबळजनक हेडलाइन्स दिसत आहेत.

 जसे- '250 महाविद्यालयीन तरुणी ठरल्या बळी, नग्न फोटो व्हायरल झाले आहेत ', 'एकामागून एक आत्महत्येवरून उठला पडदा', 'ही आत्महत्या नसून हत्या असून यामागे शहरातील बडे लोक आहेत'. अशा हेडलाईन्स या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसतायत.

काय आहे अजमेर ती घटना?

रिपोर्ट्सनुसार, 1992 मध्ये अजमेरमध्ये अशी घटना घडली होती, ज्याने सर्वांचे हृदय हेलावले होते. अजमेरमध्ये जवळपास 300 मुलींचे न्यूड फोटो काढुन त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

ही घटना शहरातील एक बडे कुटुंब आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. मेकर्सनी पोस्टरमध्ये 250 मुलींचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट 14 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Ajmer 92
Diary Of Bengal Trailer : केरळ स्टोरीनंतर आता 'द डायरी ऑफ बंगाल'...रिलीजआधी वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटाचं ट्रेलर पाहा...

'बंगाल डायरी'चाही असाच वाद

पश्चिम बंगालमधील एका दिग्दर्शकानं तयार केलेल्या द डायरीज ऑफ वेस्ट बंगाल नावाच्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डायरीज ऑफ वेस्ट बंगालची चर्चा होती.

त्यातून पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाकडून या चित्रपटाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com