Vivek Agnihotri Dainik Gomantak
मनोरंजन

'द काश्मीर फाइल्स'नंतर विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट

'द काश्मीर फाइल्सच्या' यशानंतर दिल्ली दंगलीवर विवेक अग्निहोत्रीचा येणार नवा चित्रपट

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून देत बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि पलायनावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटाला एक वर्ग विरोध करत आहे. हा चित्रपट मुस्लिमविरोधी असून लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी या मुद्द्यावर बोलताना आधीच सांगितले होते की, बॉलीवूडमधील एक वर्ग जाणूनबुजून या चित्रपटाचा विरोध करत आहे. 'द काश्मीर फाइल्सच्या' यशानंतर विवेक अग्निहोत्री यांनी नवा प्रोजेक्ट हाती घेतला असून तो ही सत्य घटनेवर आधारीत आहे. ते दिल्ली दंगलीवर चित्रपट बनवणार आहेत. (After The Kashmir Files, Vivek Agnihotri will make a film on Delhi riots)

यावेळी 'द दिल्ली फाइल्स' बनवत असल्याचे विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांनी सांगितले. जो वेब सीरिजमध्ये येईल. तसेच 'द काश्मीर फाइल्स'मध्ये (The Kashmir Files) बरेचसे शूट केले असल्याचे सांगत, काही चांगले लोक हवे आहेत जे हे सर्व एकत्र बांधू शकतील. हे खूप मनोरंजक असेल. मात्र यासाठी कोणीतरी वित्तपुरवठा करावा लागेल. हा आपला इतिहास आणि वारसा आहे आणि कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने तो उचलला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी बॉलीवूडच्या मुद्द्यावर बोलताना अग्निहोत्री म्हणाले, 'मी इथे कोणाला चुकीचे सांगण्यासाठी किंवा कोणाचा पराभव करण्यासाठी आलो नाही. आम्ही स्वतः चित्रपट बनवतो. आपण बॉलिवूडच्या बाहेर आहोत. खरं तर आपण बॉलीवूडच्या (Bollywood) अगदी विरुद्ध आहोत. आम्ही स्वतंत्र चित्रपट निर्माते आहोत. कोणी प्रशंसा केली की नाही, याची मला पर्वा नाही. मी फक्त हे सांगितले की किती प्रभावशाली लोकांना खोट्या बातम्या (News) आणि द्वेषपूर्ण प्रचाराद्वारे माझा चित्रपट खराब करायचा आहे.

फरहाननं रोमँटिक कॅप्शनसह शेअर केला शिबानीसोबत सुंदर फोटोविवेक अग्निहोत्रीने, 'मला प्रतिभावान लोकांसोबत सर्जनशील काम करायचे आहे. मी ज्या वातावरणात काम करत होतो त्या वातावरणाचा मला आनंद मिळत नव्हता, असे म्हटले आहे. तसेच स्टार कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत एखाद्या चित्रपटाचे (film) क्रिएटिव्ह, एडिटिंग आणि मार्केटिंग कंट्रोल कसे घेता येईल? लोक स्क्रिप्ट बदलायला येतात. समजा जर मी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत काम करत असाल तर तुम्हाला कोणी समजणार नाही. पण जर तुम्ही एखाद्या मोठ्या स्टारला साइन केले तर तुमचे स्टेटस खूप मोठे मानले जाईल. जर तुम्ही बादशाहासोबत काम करत असाल तर तुम्ही बादशाह आहात आणि जर तुम्ही बादशाहासोबत काम करत नसाल तर तुम्ही रंक आहात. मला फक्त ही मानसिकता मोडून व्यवस्थेला आव्हान द्यायचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT