Adnan Sami Twitter
मनोरंजन

Adnan Sami ने 'अलविदा' म्हणत केल्या इंस्टाग्रामच्या सर्व पोस्ट डिलीट, चाहते नाराज...

दैनिक गोमन्तक

Adnan Sami Deleted His All Instagram Posts: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अदनान सामीने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत, त्यासोबत फक्त एक पोस्ट बाकी आहे, ज्यामध्ये 'गुडबाय' असे लिहिले आहे. अदनानने अचानक सर्व पोस्ट डिलीट करून निरोप दिल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळांनाही सुरुवात झाली आहे.

अदनान सामीने त्याच्या सर्व इंस्टाग्राम पोस्ट हटवून फक्त एक व्हिडिओ पोस्ट ठेवली आहे. या व्हिडिओ पोस्टमध्ये अलविदा लिहिले आहे. अचानक अदनानचा ब्लँक इन्स्टा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. अदनानच्या या पोस्टपासून चाहते त्याबाबत विविध शक्यता व्यक्त करत आहेत. यासोबतच अदनानच्या या शेवटच्या पोस्टवर चाहते प्रश्न विचारत आहेत आणि कमेंट करत आहेत.

काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की अदनानचे नवीन गाणे येत आहे त्यामुळे असे करणे हा एक प्रसिद्धीचा एक मार्ग असू शकतो. तर दुसरीकडे अदनान सामीने इंस्टाग्राम सोडल्याच्या विचाराने काहीजण नाराज झाले आहेत. या शेवटच्या पोस्टवर अलविदा लिहिल्यानंतर सिंगरने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

अदनान सामी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असतो

अदनान सामीचे इंस्टाग्रामवर 672 हजार फॉलोअर्स आहेत. गायक स्वतः देखील सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि दररोज त्याच्या नवीन पोस्ट शेअर करत असतो. याशिवाय अदनान सामीने त्याचे ट्रान्सफॉर्मेशन केल्याने त्याची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे. फिटनेसबाबत लोक त्याला खूप फॉलो करतात. अदनान अनेकदा त्याचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशा परिस्थितीत अचानक अदनानचं असं 'अलविदा' म्हणणं चाहत्यांना खूप त्रास देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT