Amit Shah वर वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी फिल्ममेकर अविनाश दास गजाआड

Avinash Das: पूजा सिंघलसोबत गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो शेअर केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते अविनाश दास यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Avinash Das
Avinash DasDainik Gomantak
Published on
Updated on

Home Minister Amit Shah: पूजा सिंघलसोबत गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो शेअर केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते अविनाश दास यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश दास यांना गुजरात पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्यांनी ट्विटरवर पूजा सिंघलसोबत अमित शहा यांचा फोटो पोस्ट केला होता.

दरम्यान, पुढील कारवाईसाठी अविनाश दास यांना (Avinash Das) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) आणण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदाबाद पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डीपी चुडासामा यांनी सांगितले की, आम्ही अविनाश दास यांना मंगळवारी मुंबईतून (Mumbai) ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आमची टीम त्यांना अहमदाबादला घेऊन येत आहे.

Avinash Das
'माझं हिंदू असणं पाप आहे का?' ISRO च्या माजी शास्त्रज्ञांचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

दुसरीकडे, अहमदाबाद क्राइम ब्रँचने अविनाश दास यांच्याविरुद्ध कलम 469 (Fraud) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आयटी अ‍ॅक्ट आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दास यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेचे फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिरंगा परिधान करताना दिसत होती. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

अविनाश दास यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

अविनाश दास यांनी पूजा सिंघलचा अमित शहांसोबतचा (Amit Shah) फोटो शेअर केला. या प्रकरणी अविनाश दास यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. 'अनारकली ऑफ अरह' सिनेमा बनवणाऱ्या अविनाश दास यांना ताब्यात घेण्यासाठी अहमदाबाद क्राइम ब्रँचचे पथक गेल्या आठवडाभरापासून मुंबईत तळ ठोकून होते. पोलिसांनी सांगितले की, अविनाश दास घरातून ऑफिसला जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

Avinash Das
बीग बीनीं घेतली लेकाची बाजू; ट्रोलर्सला दिले चोख प्रत्युत्तर

अविनाश दास यांनी 2017 चा फोटो शेअर केला

अविनाश दास यांना मुंबईत आणण्याची तयारी सुरु असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अविनाश दास यांनी शेअर केलेला फोटो 2017 मधील एका कार्यक्रमाचा होता, ज्यामध्ये पूजा सिंघल गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलताना दिसली होती. या फोटोमुळे त्यांच्यावर अमित शाह यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवल्याचा आणि लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com