Adipurush release date News Update
Adipurush release date News Update Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush Motion Picture Release : प्रभासच्या आदिपुरूषचे हे मोशन पोस्टर पाहिले का? ६० सेकंदांचा व्हिडिओ वेड लावील..

Rahul sadolikar

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या प्रमुख भुमीका असलेला आदिपुरूष हा चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासुन चर्चेत आहे. पहिल्यांदा चित्रपटाच्या पोस्टरमुळे आणि त्यातल्या लूक्समुळे चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. आणि आता पुन्हा एकदा मोशन पोस्टरमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. 60 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी जबरदस्त पोस्टर लाँच केले आणि लोकांच्या मागणीनुसार 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये 'जय श्री राम'चा 60 सेकंदाचा लिरिकल ऑडिओ रिलीज केला. यासोबतच प्रभास, क्रिती सेनन आणि 'आदिपुरुष' ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, 'आदिपुरुष' च्या टीमने हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये 'जय श्री राम' ची एक आकर्षक लिरिकल ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. अजय-अतुल यांनी हे तयार केले आहे. यासोबतच #प्रभास, #कृतीसनॉन आणि #आदिपुरुष सकाळपासूनच ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.


ओम राऊतच्या चित्रपटात पराक्रमी भगवान श्री रामची भूमिका करणारा सुपरस्टार प्रभास या चित्रपटाच्या जबरदस्त पोस्टरसह ट्रॅक देखील होता. या लिरिकल ऑडिओमध्ये प्रभुश्रीरामांबद्दल म्हटले आहे - 'तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे'. 

हे मन तुम्हाला संकटसमयीच बोलावते. तुमच्या ताकदीमुळेच आमची शक्ती आहे, तुम्ही आमचे कल्याण कराल. तुझे नाम मंत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, जय श्री राम राजा राम.

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची आजवर प्रचंड चर्चा झाली आहे.

चित्रपटात सैफ अली खान करत असलेल्या रावणाच्या पात्राची सोशल मिडीयावर खिल्ली उडवण्यात आली होती,त्यानंतर प्रभासचा लूकही कॉपी करण्यात आला आहे असाही करण्यात आला होता, आता पाहुया या सगळ्या ट्रोलिंगचा आणि चर्चेचा चित्रपटाला काय फायदा होतोय का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT