मनोरंजन

Happy Birthday Govinda : गोविंदाच्या वडिलांनी जन्मावेळी त्याला का जवळही घेतलं नव्हतं ?

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ग्रेट डान्सर गोविंदाला त्याच्या वडिलांनी जवळही घेतलं नव्हतं

Rahul sadolikar

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि आपल्या वेड लावणाऱ्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. पण विरारपासुन बॉलीवूडच्या सुपरस्टारपर्यंतचा गोविंदाचा हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. त्यासाठी अगदी त्याला हॉटेलच्या नोकरीतही रिजेक्ट व्हावं लागलं होतं.

गोविंदा आता 59 वर्षांचा झाला आहे. आतापर्यंत 165 चित्रपटांत गोविंदाने काम केले आहे. त्याने इतकं यश मिळवलं कि, इंडस्ट्रीत येताच गोविंदाला 49 चित्रपटांची ऑफर आली होती. पण हे यश असंच आलं नव्हतं . खुप संघर्ष त्यामागे होता. गोविंदाने एके काळी कॅसेट विकण्याचं कामही केलं आहे.

कला क्षेत्राशी संबधित असुनही गोविंदाच्या कुटूंबियांचा त्याच्या चित्रपट क्षेत्रातल्या करियरला विरोध होता. गोविंदाचे वडिल अरुण अ‍ॅक्टर होते आणि आई गायिका होती तरीही ते गोविंदाच्या या क्षेत्रातल्या करियरला विरोध करत होते.

गोविंदाच्या जन्माआधीपासुनच त्याच्या आई-बाबांमध्ये मतभेद निर्माण झाले होते ;आणि या गोष्टीला गोविंदा जबाबदार आहे असं त्याच्या बाबांना वाटत होतं. गोविंदावरचा त्याच्या वडिलांचा राग एवढा टोकाला गेला होता कि त्याच्या जन्मावेळी वडिलांनी त्याला जवळही घेतलं नाही.

21 डिसेंबर 1963 साली मुंबईत गोविंदाचा जन्म झाला. त्याच्या वडिलांना अ‍ॅक्टर म्हणुन मेहबुब खानच्या औरत या चित्रपटाने ओळख मिळवुन दिली. या काळात गोविंदाच्या आई निर्मलादेवी एक गायीका म्हणुन नावाजल्या गेल्या होत्या.

गोविंदाच्या जन्माआधी काही काळ त्याच्या आईने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला होता. गर्भवती असताना आपल्या पत्नीने हा निर्णय घेतला याला कारण आपला आपला मुलगा आहे असाच समज त्याच्या वडिलांनी करुन घेतला होता. आणि त्यामुळेच गोविंदाच्या जन्मावेळी त्याच्या वडिलांनी जवळही घेतलं नव्हतं. काही काळाने मात्र वडिलांचा गोविंदावरचा हा राग कमी होत गेला आणि हाच गोविंदा सगळ्यांचा लाडका 'चिची' बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Title Reveal: 'सौ देशों में बदनाम...' शाहरुख खानच्या वाढदिवशी 'किंग'चा दमदार लूक रिलीज; VIDEO तूफान व्हायरल

Tulsi Vivah: सात म्हार्गाची माती हाडा, तियेची होटी भरा! गोव्यातील तुलसीविवाह ‘व्हडली दिवाळी’

50 Years Of Emergency: भारतीय आणीबाणीची 50 वर्षे

2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT