Happy Birthday Govinda: नव्वदीच्या दशकातला सुपरस्टार 'गोविंदा' अफाट श्रीमंत आहे, जाणून घ्या नेटवर्थ

Govinda Net Worth: डान्सचा बादशाह 'गोविंदा'चा आज वाढदिवस आहे.
Happy Birthday Govinda
Happy Birthday GovindaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील डान्सचा बादशाह म्हणून ओळखळा जाणारा गोविंदा चा वाढदिवस आहे. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असे आहे. पण 'गोविंदा' या नावानेच संपुर्ण देशात ओळखल आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे. डान्सच्या अदा, कॉमेडी आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील अरुण कुमार अभिनेते होते तर आई निर्मला देवी अभिनेत्री आणि गायिका होती. भावंडांमध्ये गोविंदा सर्वात लहान होता. गोविंदाचे बालपण खूपच आनंददायी गेले.

गोविंदा आज एक यशस्वी अभिनेता असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आज गोविंदा 'हिरो नं. 1' म्हणून ओळखला जातो. गोविंदाने 'इल्जाम' (Ilzaam) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. त्यानंतर अभिनय आणि डान्सने त्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावले.

Happy Birthday Govinda
Mission Imposible 7: एका सीनसाठी 60 वर्षीय टॉम क्रूझचे 500 वेळा स्काय डायव्हिंग, 13 हजारवेळा मोटोक्रॉस जंप

नव्वदच्या दशकात गोविंदाने एका वेळी 50 चित्रपट साईन केले होते. त्यामुळे जगभरात गोविंदा चर्चेत आला. तसेच 36 तासांमध्ये 14 चित्रपट साईन करण्याचा विक्रमदेखील गोविंदाने केला आहे. पण गेल्या काही दिवसांत एक वाईट काळ गोविंदाने अनुभवला आहे. गोविंदाला पाच वर्षात एकही काम मिळाले नव्हते. 

गोविंदाने 'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'साजन चले ससुराल', 'हिरो नंबर 1', 'दुल्हे राजा', 'स्वर्ग', 'बडे मिया, छोटे मिया', 'जिस देश मे गंगा रहता है', 'नसीब' अशा अनेक चित्रपटांमध्ये गोविंदाने दमदार भूमिका साकारली आहे. गोविंदाने शक्ती कपूरसोबत 42 चित्रपट तर कादर खानसोबत 41 चित्रपट केले आहेत. गोविंदाला त्याच्या दर्देदार अभिनयासाठी 'मदर तेरेसा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • गोविंदाची कमाई

गोविंदा एका चित्रपटासाठी दोन ते तीन कोटींचे मानधन घेतो. जाहिरातींमधून देखील तो चांगलीची कमाई करतो. एका जाहिरातीसाठी तो दोन कोटी मानधन घेतो. गोविंदाची वर्षाची कमाई 10 ते 12 कोटी आहे. गोविंदा 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. गोविंदाच्या आलिशान बंगल्याची किंमत 16 कोटी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com