Kantara BoxOffice Collection
Kantara BoxOffice Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Kantara BoxOffice Collection: 'कांतारा'चा कहर; 18 कोटींत बनलेल्या चित्रपटाने कमावले इतके कोटी

Akshay Nirmale

Kantara Collection Crosses 400 Crore: ऋषभ शेट्टी अभिनीत आणि दिग्दर्शित कांतारा या चित्रपटाची चर्चा रीलीज झाल्यापासून सुरू आहे. केवळ 18 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे पार केली आहेत. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये असून त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद थंड पडलेला नाही.

कांतारा चित्रपटाने जगभरात 400 कोटी रूपयांची कमाई केली आहे. एकट्या कर्नाटकता या चित्रपटाने 168 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाने कमाईच्या बाबतीत यशच्या केजीएफ-2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे.

किरकोळ बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केलेल्या कमाईमुळे फिल्म पंडितांपासून ते प्रेक्षकदेखील हैराण झाले आहेत. चित्रपटाची कमाई अशईच वाढत राहिली तर हा चित्रपट लवकरच रणबीर कपूर -आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र (431 कोटी) आणि कमल हासन यांच्या विक्रम (414 कोटी) या चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकू शकते.

कांतारा चित्रपटच रीलीज होऊन 50 हून अधिक दिवस उलटले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन शेअर केले आहे. कांतारा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 82 कोटींची कमाई केली आहे. तेलगू 42 कोटींची कमाई केली आहे. तर परदेशात या चित्रपटाने 44 कोटी रूपये कमाई केली आहे. मूळ कन्नड भाषेतील हा चित्रपट नंतर हिंदीसह तमिळ, तेलगुमध्येही रीलीज करण्यात आला. आयएमडीबीवर या चित्रपटाला 9.4 रेटिंग मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT