Shobana Dainik Gomantak
मनोरंजन

Shobana : पुन्हा कामावर घेतलं ;पण एका अटीवर... या अभिनेत्रीने चोरी करणाऱ्या मोलकरणीला केलं माफ

साऊथची अभिनेत्री शोबनाने तिच्या नोकरावर 41 हजारांची चोरी केल्याचा आरोप केला होता, आता तिने हे आरोप मागे घेतले आहेत.

Rahul sadolikar

ज्येष्ठ अभिनेत्री शोबना यांनी त्यांच्या चेन्नईच्या घरातून ₹ 41,000 च्या चोरीच्या प्रकरणी एका मोकरणीवरचे आरोप मागे घेतले आहेत . इंडिया टुडेच्या वृत्तानुसार , शोबनाने तिला पुन्हा कामावर घेतले ;पण चोरीच्या पैशांची भरपाई घरकामगाराच्या पगारातून केली जाईल.

पोलिसांच्या चौकशीत कबूली

शोबना यांनी चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती . पण, चौकशीदरम्यान त्या मोलकरणीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, शोबना यांनी आपले आरोप मागे घेतले. शोबना या भारतातल्या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार 27 जुलै रोजी शोबना यांनी चेन्नईतील टेनमपेट पोलिसांकडे त्यांच्या राहत्या घरी चोरीची तक्रार नोंदवली होती. त्या श्रीमन श्रीनिवास रोड, तेनमपेट येथे एका घरात राहतात. 

आरोप मागे घेतले आणि...

शोबाना यांनी केवळ घरकाम करणार्‍यावरचे सर्व आरोपच मागे घेतले नाहीत तर त्या मोलकरणीला पुन्हा कामावरही घेतलं आहे . शोबना यांनी कथितरित्या घरगुती मोलकरणीला माफ केले आणि सांगितले की तिला तिच्याविरूद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही. चोरीच्या पैशाची भरपाई घरकामगाराच्या पगारातून केली जाईल.

घरी नियमित चोरी व्हायची

अहवालात पुढे म्हटले आहे की शोबनाने पोलिसात तक्रार दाखल केली कारण त्यांची आई आनंदम यांनी गेल्या काही महिन्यांत त्यांच्या घरी नियमित चोरीची तक्रार केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार , घरातील मोलकरीण चोरीचे पैसे शोबना यांच्या ड्रायव्हरच्या मदतीने तिच्या मुलीच्या खात्यात पाठवत होती.

अभिनेत्री शोबना कोण आहेत?

शोबना यांनी प्रामुख्याने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसोबत मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी काही हिंदी, कन्नड आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. शोबना यांनी रुद्रवीणा (1988), नादोडिक्कट्टू (1987), वेल्लानाकालुदे नाडू (1988), इधू नम्मा आलू (1988), शिवा (1989), इनाले (1990), कलिक्कलम (1990), थलपाथी (1991), यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पप्पयुदे स्वंथम अप्पूस (1992), आणि मणिचित्रथाझू (1993).

रेवती दिग्दर्शित मित्र, माय फ्रेंड या भारतीय इंग्रजी भाषेतील चित्रपटातील भूमिकेसाठी शोबनाला 2001 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला . 2006 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT