उद्धव ठाकरे Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Maharashtra: आता उद्धव ठाकरे आणि रामदास कदम हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: महाराष्ट्रात सतत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोप होताना दिसत असतात. आता उद्धव ठाकरे आणि रामदास कदम हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर या दोन गटातील वाद विकोपाला गेल्याचे पाहिले होते. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. याबरोबरच ठाकरे गटाला देशद्रोही असे म्हटले होते.

एका जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून हातात देऊ असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान, यावर रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीभ हासडून देण्याची तुमची कुवत आहे का असा उलट प्रश्न विचाराला आहे. याबरोबरच ठाकरेच भ्रष्टाचारी आहेत असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंची अयोध्येला जाण्याची सर्व तयारी मी करुन दिली होती मात्र ठाकरेंनी मला अयोध्येला येऊ दिले नाही असाही आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर लावला आहे.

चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याबाबत ट्विटरवर काही आक्षेपार्ह ट्विटही प्रसिद्ध झाले आहेत. आता हा वाद कुठेपर्यत वाढणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT