Rahul Shewale Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेना खासदारावर महिलेने केला बलात्काराचा आरोप

शिवसेना नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे, आणि अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Woman accuses Shiv Sena MP of rape)

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर देखील नोंदवला होता. तक्रारीनुसार, ओळखीच्या व्यक्तीने 5 कोटी रुपयांची मागणी सुद्धा केली होती. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिलेला देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना धमकावून 5 कोटींची मागणी करणाऱ्या महिलेने त्यांना फेब्रुवारी ते मार्च दरम्यान एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन देखील करण्यात आले

इंटरनॅशनल नंबरवरून फोन केल्यानंतर महिलेने त्याच्याकडे पाच कोटींचे दुकान आणि एक महागडा मोबाईल मागितला होता, मागणी पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर (Social Media) मंत्र्याची बदनामी करण्याच्या धमक्याही त्या महिलेकडून देण्यात आल्या होत्या. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी ओळखीच्या व्यक्तीमार्फत तीन लाख रुपये आणि एक महागडा मोबाइल फोन कुरिअरने त्या महिलेला पाठवला.

महिलेने यापूर्वीच गुन्हा दाखल केला

त्यानंतर ही महिला मंत्र्याकडे आणखी पाच कोटी रुपयांची मागणी करत राहिली. यानंतर धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. गेल्या वर्षी एका महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती, यानंतर महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT