Icius tukarami  Twitter/ @Dhruv_spidy
महाराष्ट्र

शहीद तुकाराम ओंबळेंना मिळाली 'स्पायडर मॅन' ची ओळख

महाराष्ट्रात दोन कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लागला आहे. राज्यात दोन नव्या कोळ्याच्या प्रजातींचा (spider spacies) शोध लागला असून त्यांचं शास्त्रीय नामकरण (Icius tukarami) असं करण्यात आलं आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) दोन कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लागला असून त्यांचं शास्त्रीय नामकरण Icius tukarami असं करण्यात आलं आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबला (Ajmal Kasab) पकडून ठेवणारे जिगरबाज सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शहीद तुकाराम ओंबळे (Tukaram Ombale) यांच्या नावावरुन हे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, 26/11च्या रात्री सीएसटी रेल्वे स्थानकावर (CST railway station) हल्ला केल्यानंतर अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान (Ismail Khan) यांनी कामा रुग्णालयाला (Kama Hospital) लक्ष्य केले होते. हे दोन्ही दहशतवादी रुग्णालयाच्या मागील गेटजवळ आले परंतु कर्मचार्‍यांनी सर्व दरवाजे आतून बंद केले होते. त्यानंतर या दोघांनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचा खात्मा करून रुग्णालयाबाहेरील पोलिस पथकावर हल्ला केला होता.

कसाब आणि त्याचा दहशतवादी साथिदार इस्माईल खान यांना नंतर गिरगाव चौपाटीजवळ रोखण्यात आले, तेथे तुकाराम ओंबळे यांनी त्यांच्या रायफलची बॅरेल पकडली. त्यांच्या या चतुराईमुळे इतर पोलिस सहकाऱ्यांना कसाबला जिवंत पकडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सहायक उपनिरीक्षकांनी कसाबच्या समोर उभे राहून पॉइंट रेंजवर गोळ्या झाडल्या होत्या. तुकाराम ओंबळे यांना त्यांच्या शौर्यासाठी अशोक चक्र पुरस्कार (Ashoka Chakra Award) देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

SCROLL FOR NEXT