"केंद्रीय पथकं दबावाखाली कारवाई करत आहेत" संजय राऊतांचा घणाघात

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने काल कारवाई केली आहे.ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे माजी गृहमंत्री(Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडीने (Enforcement Directorate)काल कारवाई केली आहे.ईडीच्या या कारवाईवर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे तसेच केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या बरोबरच संजय राऊत यांनी ईडी करत असलेल्या अनेक कारवाईंबाबत प्रसन्नचिन्ही उपस्थित केला आहे. सध्या अयोध्यतील (Ayodhya) राम मंदिर(Ram Mandir) जमीन घोटाळा सर्वात मोठा असून ईडी तिथे चोकशी का करत नाही असा सवाल ईडीला विचारताना राऊत म्हणाले, 'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात घोळ आहे म्हणून त्यांना त्रास देत ‘ईडी’ने त्यांची चोकशी सुरुवात केली आहे . पण सध्या सगळ्य़ात मोठा जमीन घोटाळा अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात झाल्याचे समोर आले. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना श्रीराम जन्मभूमी न्यासाला विकल्या. हा सुद्धा ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ तपासाचा विषय आहे, पण ते सर्व मोकळेच आहेत' अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut
कोकण-रेल्वे मार्गावरील वाहतुक 6 तासांत पुन्हा सुरु

यापूर्वी देखी संजय राऊत यांनी ईडीला धारेवर धरलं होत सामनामध्ये ईडीची तुलना ब्रिटिशांच्या राजवटीशी केली असून ते म्हणाले की, “ देशात सध्या सत्तापक्षातील काही लोकांवर ठरवून कारवाई केली असून गुन्ह्यांचं स्वरुप पाहता राज्यातील तपास यंत्रणा समर्थ आहेत. पण केंद्रीय पथक कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करतात हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे”.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com