Mangeli Waterfall Dainik Gomatank
महाराष्ट्र

सिंधुदुर्गातील मागेली धबधबा प्रवाहित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मागेली धबधबा (Mangeli Waterfall) 200 ते 250 फुटावरून कोसळत आहे.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात वर्षा पर्यटनाला (Tourism) उधाण आले आहे. कारण मान्सून (Monsoon) राज्यात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मागेली धबधबा (Mangeli Waterfall) 200 ते 250 फुटावरून कोसळत आहे. परंतु , यंदा कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पर्यटकांना या धबधब्याच्या सौंदर्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचे मनमोहक असे रूप दिसून येत आहे.

वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. पण यंदा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. असा निर्णय मागेली ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. जर पर्यटक नियमांचे पालन करत नसतील. धबधब्याजवळ पर्यटक गर्दी करत असतील , तर त्यांना 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांवर येथील पोलिसांद्वारे कारवाई देखील करण्यात यावी, अशी मागणी मागेली सरपंच विश्वनाथ गवस यांनी केली आहे.

परंतु, यंदा कोरोना संकटामुळे देशभरातील पर्यटनस्थळी जाण्यास निर्बंध असल्याने धबधब्याच्या सौंदर्याला मुकावे लागणार असल्याने पर्यटकांत नाराजी दिसून येत आहे.तसेच पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरु करावा अशी मागणी येथील व्यावसायिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT