गोवा-कर्नाटक सीमेलगतचा दुधसागर धबधबा कॅसलरॉकपासून 13 कि.मी. अंतरावर

कर्नाटक-गोव्याच्या (Karnataka Goa) सीमेवर घनदाट जंगलात असलेला प्रसिद्ध दूधसागर धबधबाही (Dudhsagar Falls) आता पाढंरा शुभ्र होवून कोसळू लागला आहे.
Dudhsagar Waterfalls
Dudhsagar WaterfallsDainik Gomantak

राज्यात वर्षा पर्यटनाला (Tourism) उधाण आले आहे. कारण मान्सून (Monsoon) राज्यात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून पश्‍चिम घाटात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. कर्नाटक-गोव्याच्या (Karnataka Goa) सीमेवर घनदाट जंगलात असलेला प्रसिद्ध दूधसागर धबधबाही (Dudhsagar Waterfalls) आता पाढंरा शुभ्र होवून कोसळू लागला आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पर्यटकांना या धबधब्याच्या सौंदर्यापासून वंचित राहावे लागत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होताच देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांनाही दूधसागर धबधब्याची आठवण होते. दरवर्षी हा धबधबा जुलैनंतरच पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होतो. पण, यावर्षी मात्र पहिल्याच पावसात दूधसागर भरभरून कोसळू लागला आहे. त्याचे रौद्र आणि मनमोहक असे रूप आताच दिसून येत आहे.

Dudhsagar Waterfalls
सीमा खुल्या केल्याने राज्यात पर्यटक येणे सुरू

उंच शिखरावरुन कोसळणारा हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असतांनाचे त्याचे रुप पाहण्यासारखे आहे. धबधब्याचे पांढरे शुभ्र पाणी आताच पर्यटकांना साद घालत आहे. पण, यंदा कोरोनामुळे धबधबा पाहण्याची इच्छा मनातच दडपून ठेवावी लागणार आहे. हा दूधसागर धबधाबा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कर्नाटकाच्या या जंगलात येत होते. मात्र, मध्यंतरी धबधब्यात बुडून मृत्यू होणे, पर्यटकांकडून पाण्यात होणारी हुल्लडबाजी, धावत्या रेल्वेत चढताना पडून जखमी होणे, रेल्वे अधिक काळ थांबत नसल्याने वातानुकुलीत डब्याच्या काचा फोडणे असे प्रकार झाले होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी येण्यास पर्यटकांना बंदी घातली होती. मात्र ही बंदी मागच्यावर्षी हटविल्यानंतर बेळगाव-वास्को लोकल रेल्वे सुरु करण्यात आली होती. त्यामुळे, या स्थळी पर्यटकांची गर्दी वाढली होती.

Dudhsagar Waterfalls
Deccan Express Vistadome: जाणून घ्या डेक्कन एक्स्प्रेसचा टाइमटेबल

परंतु, यंदा कोरोना संकटामुळे देशभरातील पर्यटनस्थळी जाण्यास निर्बंध असल्याने धबधब्याच्या सौंदर्याला मुकावे लागणार असल्याने पर्यटकांत नाराजी दिसून येत आहे. या हंगामात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे कॅसलरॉक गावात जत्रेचे स्वरूप येत होते. पण, मध्यंतरी पर्यटकांवर घातलेल्या बंदीमुळे गावातील लोकांचा रोजगार बुडाला होता. मागीलवर्षी बंदी उठवल्यानंतर गावातील युवकांना पुन्हा रोजगार मिळाला होता. मात्र, यंदा पुन्हा लॉकडाउनमुळे रेल्वे बंद असल्याने कॅसलरॉकमधील युवक बेरोजगार झाले आहेत. दुधसागर धबधबा उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा डिग्गी या गावांतून उगम पावून कुवेशी येथून डोंगराळ भागातून ओसंडताना दिसतो. गोवा-कर्नाटक सीमेलगतचा हा धबधबा कॅसलरॉक स्थानकापासून 13 कि.मी. अंतरावर आहे. या मार्गावरून जाताना अनेक लहान-मोठे धबधबे आणि 10 बोगदे पहायला मिळतात. दूधसागर स्थानकावरून 11 वा बोगदा मात्र पायीच पार करावा लागतो. पण त्यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com