Special Diwali train will run on Madgaon to Panvel route Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: मडगाव-पनवेल मार्गावर धावणार दिवाळी विशेष गाडी

दिवाळी विशेष गाडी मडगावहून 7 तर पनवेलहून 8 नोव्हेंबरला सुटणार

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी : दिवाळी म्हटलं की, घर, घरात असलेली रेलचेल आणि खमंग दिवाळीचा फराळ आठवतोच. आणि घरापासून दुर राहणाऱ्यांना तर दिवाळीची प्रचंड ओढ असते कारण त्यांना दिवाळीला घरी जायचं असतं. महाराष्ट्रातील काही लोकं आणि गोव्यातील काही लोकं कामानिमित्त राज्याबाहेर राहतात आणि दिवाळीला (Diwali) म्हणा किंवा सणासुदीला घरी येतात.

अशातच कोकण रेल्वेने दिवाळीनिमित्त गोवा ते महाराष्ट्र अशी विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मडगाव -पनवेल - मडगाव अशी धावणार आहे. दि. 7 नोव्हेंबरला मडगावहून ही गाडी सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वा. 15 मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे.

दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर या आधी देखील अनेक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघून कोकण रेल्वेने मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडीची (01596/95) सोय उपलब्ध करून दिली आहे. ही गाडी दि. 8 नोव्हेंबर रोजी पनवेलहून सकाळी 6 वा. 15 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी सायंकाळी पावणे सात च्या दरम्यान गोव्यात मडगावला पोहचणार आहे. ही गाडी करमाळी, थीवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे रोड, चिपळूण, खेड, माणगाव तसेच रोहा स्थानकावर थांबणार असून कोकणातून या गाडीचा प्रवास असणार आहे. एकूण 22 एलएचबी कोचसह ही गाडी फर्स्ट क्लास वातानुकूलित टू टायर एसी थ्री टायर एसी स्लीपर कोच, सर्वसाधारण चार, पॅन्ट्री कार तसेच दोन जनरेटर कार दोन अशा कोच रचनेसह कोकणातील निसर्गसौंदर्याच्या भागातून धावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT