कोरोना महामारी कमी झाल्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यात आले. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात आली. मंदिर उघडल्यानंतर हा पहिला दीपोत्सव आहे. या शुभ मुहूर्तासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जोरदार तयारी केली आहे. मंदिरात मनमोहक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरे मोठ्या प्रमाणात सजवण्यात आली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या वेळी दर्शनाचा कार्यक्रम काही काळ थांबणार आहे. पूजेनंतर भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू होईल. आणि यंदा साईभक्तांना दौपोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पण कोरोनाशी संबंधित नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. शिर्डीत आज दीपोत्सव थाटामाटात साजरा होणार आहे. कोरोनाचे नियमही तितक्याच काटेकोरपणे पाळले जातील. अशी माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
साई संस्थानच्या वतीने परंपरेनुसार सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत साईबाबा समाधी मंदिराच्या गर्भगृहात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन आणि धूप-नैवेद्य संबंधित सर्व शुभ कार्ये होतील. सायंकाळी 5 वाजल्यापासून हे कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी दर्शनाची वेळ पुढे ढकलण्यात येणार आहे. सात वाजल्यानंतर साईभक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर साई मंदिराच्या सजावटीमध्ये भाविकांचे मोठे योगदान
या शुभ दौपोत्सवानिमित्त साई मंदिराच्या सजावटीत भाविक उत्स्फूर्तपणे योगदान देत आहेत. शनि शिंगणापूर येथील गणेश शेटे यांनी पुढाकार घेऊन त्यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शिर्डीतील साईभक्त विजय तुळशीराम कोटे समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान या ठिकाण आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
ऑफलाइन दर्शन पास सुरू करण्याची मागणी वाढली आहे
शिर्डीच्या साई मंदिरात दरवर्षी दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे त्यावर निर्बंधांचे सावट होते मात्र यावेळी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र असे असतानाही भाविकांना ऑनलाइनद्वारेच दर्शनासाठी पास दिले जात आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे पण पुर्ण गेला नाही. शिर्डीत कोरोना बाधितांची संख्या जरी कमी असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुन्हा ऑफलाइन दर्शन पास घेण्याची सुविधा मिळावी, अशी भाविकांची मागणी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.