Crime In Goa Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Crime News : मुलाने लग्नासाठी महिलेला पळवून नेले, बदनामीच्या भीतीने कुटुंबातील 7 जणांनी संपवलं आयुष्य

भीमा नदीच्या पात्रात आढळले मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

Rajat Sawant

Pune Crime News : भारतीय समाजव्यवस्थेवर जातीय पगडा मोठा आहे. जात हा अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो त्यामुळेच जातीबाहेर लग्न करणे हे अनेकजण कथितरित्या कमीपणाचे मानतात. त्यातूनच जातीबाहेर विवाहाला विरोध केला जात असतो.

तथापि प्रेम ही सहजभावना असल्यामुळे अनेक तरुण तरुणी प्रेमात पडून आंतरजातीय विवाह करत असल्याच्या घटना दिसून येतात. त्यानंतर पण अशा लग्नांना विरोध असणाऱ्या नातेवाईकांकडून अशा प्रेमी युगलांबाबत क्रुर प्रतिक्रीया उमठत असतात. अशीच एक घटना समोर येत आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलाने महिलेला लग्नाकरिता पळवून नेल्याच्या रागातून वडिलांसह कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली आहे. या मृतांमध्ये 3 लहान मुलींचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ पसरली आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

मनोज पवार कुटुंब हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज या गावात पवार कुटुंब राहत होतं. मनोज यांच्या छोट्या मुलाने वडार समाजातील महिलेला लग्नाकरिता पळवून नेले. ही महिला पतिपासून विभक्त राहत होती.

या घटनेची माहिती वडिलांनी मोठ्या मुलाला दिली. महिलेला परत आणण्यास सांग अन्यथा आम्ही आत्महत्या करु असे सांगितले. मात्र मुलाने लग्न करण्याकरिता पळवून नेलेल्या महिलेला परत न आणल्याने वडिलांना राग आला. राग आल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 

पवार कुटुंब 17 जानेवारीला रात्री निघोज गावातून निघाले. दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह आढळून आले. मोहन पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृतांची नावे आहेत.

त्यांनंतर याच कुटुंबातील भीमा नदीच्या पात्रात 18, 20, 21 आणि  22 जानेवारीला चार मृतदेह आढळून आले होते. पोलिसांनी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य घेत मृतदेह नदीच्या बाहेर काढले.

पती पत्नी, मुलगी, जावई व त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात सापडल्याने परिसरात खळबळ पसरली. एकाच कुटुंबातील मृतदेह आढळल्याने कुटुंबाने आत्महत्या केली की घातपात झाला असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिस चौकशीअंती आत्महत्या नसल्यांच समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजा संतापला, अचानक थांबला खेळ; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT