Fire In Goa : विद्युत तारांच्या स्पर्शाने ट्रकलमधील गवताने घेतला पेट; सत्तरीतील घटना

आगीवर नियंत्रण मिळविण्यात वाळपई अग्निशमन दलाला यश
 truck caught fire
truck caught fire Dainik Gomantak
Published on
Updated on

Fire In Goa : राज्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाळपई येथे एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जिवतहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात वाळपई अग्निशमन दलाला यश आले आहे.

 truck caught fire
ABVP Protest: उपजिल्हाधिकाऱ्यांचा तोडगा; झेवियर्स कॉलेज प्रशासनास दिली 'ही' मुदत

याबाबत अधिक माहिती अशी की, एका आयशर ट्रकमधून वाळलेल्या गवताची वाहतूक होत होती. हा ट्रक सत्तरीतील नागरगाव पंचायतीजवळ आला असता त्यातील गवताचा स्पर्श विद्युत तारांना झाला. त्यामुळे गवताने पेट घेतला. ही घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वाळपई अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवीले. या आगीत 15 हजार रुपयांचे नुकसान झाले असून 8 लाखांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com