ABVP Protest: उपजिल्हाधिकाऱ्यांचा तोडगा; झेवियर्स कॉलेज प्रशासनास दिली 'ही' मुदत

उपजिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेज प्रशासन, विद्यार्थ्यांची बैठक पार पडली
ABVP Member And ST Xavior Students
ABVP Member And ST Xavior StudentsDainik Gomantak

ABVP Protest: सेंट झेवियर्स कॉलेज प्रकरणा बार्देशच्या उपजिल्हाधिकार्ऱ्यांनी लक्ष घालत विद्यार्थी मंडळाचे अधिकारग्रहण 4 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश कॉलेज प्रशासनाला दिले आहेत.

बार्देश उपविभागीय दंडाधिकारी आयएएस यशस्वविनी बी. यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासन व कॉलेज विद्यार्थी परिषदच्या तीन विद्यार्थी, शिक्षण खात्याचे दोन प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली.

ABVP Member And ST Xavior Students
Valpoi : वाळपई नगरपालिकेची बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध धडक कारवाई

बैठकीनंतर माध्यमांसमोर बोलताना सेंट झेवियर्स कॉलेजचा सरचिटणीस (जीएस) साहिल महाजन म्हणाले की, "उपविभागीय दंडाधिकार्‍यांसोबत आमची संयुक्त बैठक झाली. बैठकीत दंडाधिकार्‍यांनी कॉलेज प्रशासनच्या व्यवस्थापनाला पाच दिवसांत तारीख जाहीर करण्यास सांगितले आहे".

"२४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान पाच दिवसांत अधिकारग्रहण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यास सांगितले आहे आणि ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत हा औपचारिक अधिकारग्रहण कार्यक्रम पार पाडावा असे निर्देश दिलेत".

"तसेच आमचा लढा हा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. यात कुठलेही राजकारण नव्हते किंवा आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही" असेही साहिल महाजन म्हणाले.

ABVP Member And ST Xavior Students
Mahadayi Water Dispute: ...तर गोव्यातील 25 हजार कोटींची उलाढाल ठप्प; मंत्री मॉविन गुदिन्हो यांचा इशारा

दरम्यान, या घटनेवर भाष्य करण्यास नकार देत या विषयावर बोलणे उच्च शिक्षण विभागाचे काम आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे म्हणाल्या की, "अभाविपने कॉलेजमधील चालू वर्ग बंद केल्याबद्दल बार्देशच्या मामलेदारांकडे अहवाल मागणार आहे".

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न असलेल्या काही विद्यार्थ्यांनी शनिवारी म्हापशातील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये घुसखोरी करीत तेथील चालू वर्ग बंद पाडले व धुडगुस घातला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com