Sea Gold fish Dainik Gomantak
महाराष्ट्र

घोळ माशामुळे मच्छीमार झाला मालामाल

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक मच्छीमार एका झटक्यात करोडपती झाला आहे. पालघरमध्ये फिशिंग टेकल म्हणून काम करणारे चंद्रकांत तरे आपल्या 7 साथीदारांसह नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीला गेले. मात्र, यावेळी जाळ्यात अडकलेल्या माशांची किंमत कोट्यवधी होती आणि नशिबच पालटलं. यावेळी 'सी गोल्ड' नावाचे दुर्मिळ मासे (Sea Gold fish) त्यांच्या जाळ्यात अडकले. आणि लॉटरीच लागली.

चंद्रकांत आणि त्याच्या साथीदारांच्या जाळ्यात 157 Sea Gold मासे एकत्र पकडले गेले. परतल्यावर चंद्रकांतने त्यांना विकले तेव्हा ते 1.33 कोटी रुपयांना विकले गेले. या माशांचा लिलाव पालघरच्या मुरबेमध्ये झाला. चंद्रकांतचा मुलगा सोमनाथ याने सांगितले की त्याने प्रत्येक मासा सुमारे 85 हजार रुपयांना विकला आहे.

कुठे मिळाले हे मासे?

चंद्रकांत यांनी सांगितले की, ते 7 लोकांसह समुद्रात 20 ते 25 नॉटिकल मैल समुद्रात वाधावनच्या दिशेने हरबा देवी नावाच्या बोटीने गेले होते. ते या आधी कित्येक वेळा या भागात मासे पकडण्यासाठी आले आहेत. यावेळी 157 Sea Gold मासे त्याच्या जाळ्यात अडकले. चमकते मासे पाहूनच त्यांना समजले की आता त्याचे नशीबही चमकले आहे. समुद्रातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे हे मासे आता किनाऱ्यावर सापडत नाहीत. या माशांच्या शोधात मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागते, असे चंद्रकांतच्या यांनी सागितले.

'सी गोल्ड' मासे इतके महाग का आहेत?

या माशाचे वैज्ञानिक नाव 'प्रोटोनिबीया डायकॅन्थस' (Protonibea Diacanthus) आहे. त्याला 'सी गोल्ड' मासे असे म्हणतात. कारण या माशांचा वापर औषधे आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. थायलंड, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर सारख्या आपोआप स्वतःच वितळतात, ते देखील या माशापासून बनवले जातात. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात या माशांची किंमत जास्त आहे. हे मासे यूपी आणि बिहारमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केले आहेत, असे मच्छीमार सोमनाथ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT