संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणूक लढवणार की नाही असा सवाल आता निर्माण झाला आहे तर याबाबतची भूमिका संभाजीराजेंनी मांडली आहे. येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान संभाजीराजेंची राज्यसभेच्या लढतीतून माघार घेतली आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत होती. (Sambhaji Raje Chhatrapati)
स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. तर राष्ट्रवादीनेही सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. मात्र, यावरून यूटर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. सेनेने छत्रपतींना शिवबंधन बांधण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र राजेंनी ती धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड झाला आहे. अखेर सेनेने कोल्हापुरातूनच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली आहे.
तर संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून माघार घेण्याची शक्यता वाढली आहे. सकाळीच त्यांनी ट्वीट करत माझी बांधिलकी जनतेशी असल्याची पोस्ट केली आहे, आणि यानंतर चर्चा वाढल्या आहेत. शिवसेना असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, मी त्या पक्षांत थेट प्रवेश करणार नाही. असे अजिबातच नाही की, मी खासदारकीसाठी अगतिक आहे, शिवशाहूंचा विचार, मराठा व बहुजन समाजाचे प्रश्र्न घेवून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून माझे कार्य सुरुच राहील असे सभांजी राजे म्हणाले. मविआच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच भाजपने देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेले नव्हते. त्यामुळे दिल्लीसाठी आकड्यांची समीकरणं जुळवताना संभाजीराजेंना कसरत करावी लागत आहे.
सेनेची ऑफर अन् पवारांची खेळी...भाजपचा सस्पेन्स
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर करताच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देत खेळी केली आहे. यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यानी यू टर्न घेतला आहे. शिवसेनेने राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर देखील दिली. यातून राजकारण आणखी वेगळ्या वळणावर गेले आहे. तर सहावी जागा भाजपच्या गोटातून रिक्त होत आहे.
मात्र भाजपला संख्याबळाचं समीकरण साधण्यात घाम गाळावा लागणार असल्याने महाविकास आघाडीला त्यामध्ये सरशी मिळू शकते. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. शिवसेनेकडे मविआ सरकारमधील सर्वाधिक आमदार आहेत आणि त्यामुळेच राज्यसभेच्या जागेवर सेनेचा नेता जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.