Sachin Waje Dainik Gomantak
महाराष्ट्र

सचिन वाजे प्रकरणात NIA च्या हाती मोठं घबाड..

दैनिक गोमन्तक

Ambani Bomb Scare:एनआयएच्या तपासात परमबीर सिंह (Parambir Singh)आणि सचिन वाजे(Sachin Waje) यांच्याविषयीची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ईशान सिन्हा (Ishaan Sinha)नावाच्या सायबर तज्ज्ञाने (cyber expert)बनावट अहवाल आणि पैशांचे व्यवहार सापडले होते त्याबद्दल सांगितले. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून जैश-उल-हिंदकडून अंबानींच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्याबद्दल टेलीग्रामवर(telegram) खोटा अहवाल दिला होता. आणि त्याचवेळी सचिन वाजे यांच्या मैत्रिणीने पैशाच्या व्यवहाराबाबत मोठे खुलासे केले आहेत.

त्यानंतर, NIA च्या तपासात परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांच्याबद्दलचे काही खुलासे झाले आहेत. सायबर तज्ञ ईशान सिन्हा यांनी NIA दिलेले विधान अत्यंत धक्कादायक आहे. जैश-उल-हिंदने अंबानी यांच्या कुटुंबाला दिलेल्या धमकीबद्दल ईशानकडून टेलीग्रामवर परमबीर सिंगने सुधारित अहवाल बनवला होता. इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर इशानने दिल्ली स्पेशल सेलला हाच अहवाल दिला होता.

ईशानने त्या अहवालामध्ये बदल केला आणि परमवीर सिंगच्या सांगण्यावर एक धमकी देणारे पोस्टचा बनावट अहवाल बनवला. जेणेकरून अंबानींना धमकी तिहारमधून (Tihar)आली होती असे सिद्ध करता येईल. या बनावटी अहवालाच्या बदल्यात, परमवीर सिंगने ईशानला त्याच्या केबिनमध्ये 5 लाख रुपये दिले होते.

असा सचिन वाजेच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला:

दुसरीकडे, सचिन वाजेच्या मैत्रिण मीनाने NIA ला दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने महिला एस्कॉर्ट आहे. आणि वाजे हे तिच्यासोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

मीना पुढे म्हणाली, 2011 मध्ये वाझेला एका 5 स्टार हॉटेलमध्ये (5 Star Hotel)भेटली होती, तेव्हापासून ती पोलिस सेवेत रुजू होण्यासाठी वारंवार वाझेला भेटत होती. वाजे यांच्या सांगण्यावरून मीनाने काही कंपन्यांची नोंदणी देखील केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसात परत आल्यानंतर वाझेने मीनाला एस्कॉर्टची नोकरी सोडण्यास सांगितले होते. आणि मुंबई पोलिसात पुन्हा रुजू झाल्यावर त्याच्या खर्च भागवण्यासाठी दरमहा 50,000 देण्यास सुरुवात केली.

यातून 1.5 कोटी व्यवहार समोर आले :

वाजेने दोन वेगवेगळ्या प्रसंगात 40 लाख आणि 36 लाख रु रोख दिले. ओबेरॉय हॉटेलमध्ये मुक्काम करताना ते परतही घेतले. NIA ला दोघांच्या एकत्रित असलेल्या लॉकरमध्ये रोख रक्कमही सापडल्या. वाजे यांच्या सांगण्यावरून मीना यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमधून 1.5 कोटी रुपयांचे व्यवहारही सापडले आहेत.

मीनाने NIA ला सांगितले की, सचिन वझेना माहित आहे, हे पैसे त्यांच्या खात्यात कोण पाठवत होते. त्यांनी या खात्यांचे रिकामे धनादेश सचिनला स्वाक्षरी करून दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT