परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल ,मुंबई पोलिसांची कारवाई

परमबीर सिंह( Parambir Singh) यांच्यासह इतर आठ जणांविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक केलीआहे
Ransom case against Parambir Singh, action taken by Mumbai Police
Ransom case against Parambir Singh, action taken by Mumbai PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh ) यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या विरुद्धच आता खंडणीचा गुन्हा (Case Of Extortion Registered) दाखल झाला आहे त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.

परमबीर सिंह यांच्यासह इतर आठ जणांविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक केलीआहे. एका व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police Station) हा गुन्हा दाखल केले असल्याचे समजत आहे.

Ransom case against Parambir Singh, action taken by Mumbai Police
Facebook रिक्वेस्ट पडली महागात; महिलेचे 18 लाख घेवून SANTIAGO फरार

सचिन वाझे (Sachin Waze) याच्या मार्फत पैसे वसुली करत असल्याचा गंभीर आरोप एका पत्राद्वारे परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता.त्यांच्या या आरोपाने राज्याच्या रकरणात एकच खळबळ उडालं होती.याच प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आणि अखेर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

परमबीर सिंह यांच्याविरोधातील प्राप्त तक्रारींबाबत महाराष्ट्र सरकारने गेल्याच आठवड्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता ज्यानुसार परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने अँटी करप्शन ब्युरोला दिले होते. दरम्यान, परमबीर सिंह हे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्याही निशाण्यावर आहेत कारण एका प्रकरणात त्यांची इडीद्वारेही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात इडीने त्यांना नोटीसही बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com