Rajya Sabha Elections 2022 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Rajya Sabha Elections 2022: 4 राज्ये 16 जागा! भाजपचा डाव अन् मविआची लढत

राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान पार पडलं.

दैनिक गोमन्तक

राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील 6 जागांपैकी भाजपने 3 जागा जिंकल्या तर त्यांचे 3 उमेदवार पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. MVA मधून शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी उर्वरित 3 जागा जिंकल्या आहेत. (Rajya Sabha Elections 2022)

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. तसेच, शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मते मिळाली. त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली पण, दुसऱ्या पसंतींच्या मतांच्या महाडिक यांना जास्त मिळाल्यानं त्यांचा विजय झालाय.

भाजपाच्या विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

"कोणाचा पराभव झाला? पहिल्या पसंतीची सर्वाधिक मत संजय पवार यांना मिळाली. मोठा विजय झाला, हे चित्र उभं केलं जातंय. काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाहीत, ते आम्हाला माहीती आहे. पण राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया किचकटच असते. ज्यांना विजय मिळाला त्यांचं अभिनंदन".

"आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेलेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांची व्यूहरचना उत्तमच होती. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं, निवडणूक आयोगाने त्यांनाच प्राधान्य दिलं", पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी मत व्यक्त केलं आहे.

विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. शिवसेनेच्या संजय पवारांशी अटीतटीची लढत देत भाजपाचे धनंजय महाडिक निवडून आले. भाजपाच्या तिन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र!"

राजस्थानमध्ये कोणाला किती मतं मिळाली?

रणदीप सुरजेवाला यांना 43 मतं मिळाली.

मुकुल वासनिक यांना 42 मतं मिळाली.

घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.

प्रमोद तिवारी यांना 41 मतं मिळाली.

डॉ. सुभाष चंद्रा यांना 30 मतं मिळाली.

हरियाणात कोण जिंकले?

2 पैकी 1-1, भाजप आणि काँग्रेस

भाजप - कृष्ण पाल पंवार- 31

अपक्ष - कार्तिकेय शर्मा

काँग्रेस - अजय माकन- पराभूत

कर्नाटकातील विजयी उमेदवार

निर्मला सीतारमण - भाजप 46

जग्गेश- भाजप 46

लहर सिंह सिरोया- भाजप 33

जयराम रमेश- काँग्रेस 46

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT